S M L

शरद पवार- सुरेश कलमाडी युती

28 मार्चकाँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचाराचा नारळ आज पुण्यात काँग्रेस भवनात फुटणार आहे. या निमित्ताने होणार्‍या सभेला पवारांसह मुख्यमंत्री अशोक चव्हाणही उपस्थित राहणार आहेत. एवढंच नव्हे तर शरद पवार कलमाडींचा प्रचारही करणार आहेत. राजकारणात कधी कोणती समीकरणं जुळतील आणि कालचे शत्रू आजचे मित्र होतील हे सांगता येत नाही याचंच हे ताजं उदाहरण. दोन वर्षांपूर्वी पुण्याचा कारभारी बदला असं म्हणणारे शरद पवार आता जुन्या कारभार्‍यालाच म्हणजे सुरेश कलमाडींनाच पाठिंबा द्यायला तयार झालेत. 2007 मध्ये झालेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत दस्तुरखुद्द शरद पवारांनी प्रचाराची राळ उठवत सुरेश कलमाडींची 10 वर्षांची सत्ता उलथून टाकली होती. पवारांचे पुतणे अजित पवारांनी सेना-भाजपशी हात मिळवणी करत पुणे पॅटर्नची सत्ता महापालिकेत आणली. पण आता शरद पवार- सुरेश कलमाडी हे गुरू-चेले सर्व गिले शिकवे विसरत एकत्र येताहेत. पवारांबरोबर अजित पवारांनाही कलमाडींनी प्रचाराचं आमंत्रण दिलंय. यावेळी पुणे जिल्ह्यात 3 ठिकाणी काँंग्रेस राष्ट्रवादीला मदत करतेय हे सांगायला कलमाडी विसरले नाहीत. पण पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे अजित पवार कलमाडींच्या प्रचारसभेला येऊ शकणार नसल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात येतंय. त्याचबरोबर राज्यात 26 ठिकाणी राष्ट्रवादी काँंग्रेस पक्ष काँग्रेसच्या उमेदवारांना मदत करून हिसाब किताब बरोबर करत आहे. तर आता परभणीमधेलवकरच राष्ट्रवादी आघाडीची संयुक्त प्रचार सभा होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 28, 2009 09:52 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 28, 2009 09:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close