S M L

मनमोहन सिंग करणार आसमामधून प्रचाराला सुरुवात

7 एप्रिल, गुवाहाटीपंतप्रधान मनमोह सिंग आज आसाममध्ये तणावपूर्ण परिस्थिती असूनही प्रचार मोहिमेला सुरुवात करणार आहेत. ते आसामच्या प्रचार दौ-याच्या कार्यक्रमात कोणताही बदल करणार नाहीयेत. काल सोमवारी त्यांच्या दौर्‍याच्या पूर्वसंध्येलाच गुवाहाटीत चार बॉम्बस्फोट झाले. पण पंतप्रधानांचा कार्यक्रम ठरल्याप्रमाणं पार पडणार आहे. गुवाहाटीपासून 400 किलोमीटरवर असणार्‍या दिब्रुगड आणि दिसपूरमध्ये पंतप्रधानांच्या जाहीर सभा होणार आहेत. बायपास सर्जरीनंतर पंतप्रधानांची ही पहिलीच जाहीर सभा असणार आहे. दरम्यान, उल्फा अतिरेकी संघटनेचा आज स्थापना दिवस आहे. त्यामुळे आणखी घातपाताची शक्यता आहे. सहा तासांत काल सोमवारी आसाममध्ये चार बॉम्बस्फोट झाले. पहिला स्फोट राजधानी गुवाहाटीतल्या मालिगाँव भागात झाला. त्या स्फोटांत एका मोटारसायकलवर बॉम्ब ठेवण्यात आला होता. त्या स्फोटात सात जण तात्काळ ठार झाले. दुसरा स्फोट कालच दुपारी चार वाजता तेजपूरजवळच्या सोनितपूरमधल्या धेकाईजुलीत झाला. त्यात चार लोक जखमी झाले. त्याही स्फोटातला बॉम्ब मोटारसायकलवरच ठेवण्यात आला होता. उरलेले दोन स्फोट कालच संध्याकाळी भारत बांगलादेश सीमेवर असलेल्या मानकछर आणि उदलगिरीत काही मिनिटांच्या अंतरात दोन ग्रेनेड हल्ले झाले. हल्ल्यांमध्ये पोलिसांना लक्ष करण्यात आलं होतं. त्यात एक जण ठार तर अनेक जण जखमी झालेयत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 7, 2009 07:09 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 7, 2009 07:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close