S M L

पिराची कुरोलीत अस्पृश्यता आजही कायम

11 एप्रिल, पंढरपूर सुनील उंबरेपंढरपूरमधल्या पिराची-कुरोली या गावात अस्पृश्यता आजही कायम आहे. गावात राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रम राबवला गेला असला तरी तिथं मारुतीच्या मंदिरात दलितांना प्रवेश नाही. पिराची कुरोली या गावात दलितांचा वाद हा फक्त मंदिरातूनच नाही तर स्मशानावरूनही आहे. त्या गावात अस्पृश्यता मृत्यूनंतरही दलितांचा पाठलाग सोडत नाही याचा दाहक अनुभव रामचंद्र नाईक नवरेंना आला. त्यांच्या वडिलांचं प्रेत स्मशानात जाळण्यास गावातल्या सवर्णांनी आडकाठी आणली. दलिताचं प्रेत चितेवरून अर्धवट जळलेल्या अवस्थेत फेकल्याचं रामचंद्र नाईक-नवरे आणि पिराची कुरोली गावातल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितलं. रामचंद्र नाईक-नवरे यांच्या वडिलांचं प्रेत सवर्णांनी फक्त जाळूच दिलं नाही. तर ती जागा शेणानं सारवलीही. अशी माहिती दलित चळवळीतील कार्यकर्ते दिलीप देवकुळे यांनी दिली. आज इतक्या वर्षांनंतरही खेडोपाड्यात अस्पृश्यता अजुनही पाळली जाते. पिराची कुरोलीसारख्या गावांत तर अस्पृश्यतेचं हे विष एवढं खोलवर रूजलंय की ते तिथल्या दलितांच्या मरणानंतरही ते त्याची पाठ सोडत नाही. पण वेगळ्या स्मशानभूमीची कल्पना गावातल्या दलितांना मान्य नाही. गावातल्या सवर्णांचे सगळे अत्याचार सहन करतच इथला दलित जगत आहे आणि अस्पृश्यतेच्या दाहक विस्तवावरच त्याला आपली चूल मांडावी लागतेय.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 11, 2009 12:18 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 11, 2009 12:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close