S M L

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 118 वी जयंती साजरी

14 एप्रिलआज डॉ.बाबसाहेब आंबडेकरांची 118 वी जयंती साजरी केली जात आहे. राज्यभरातत्यांचे अनुयायी महामानवाला अभिवादन करत आहेत. नागपुरातील दिक्षा भूमी आणि मुंबईतील चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणात त्यांच्या अनुयायांनी गर्दी केली आहे. मानवजातीच्या हक्कासाठी लढणार्‍या बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राज्यातील विविध भागात त्यांना मानवंदना दिली जात आहे.डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 118 व्या जयंती निमित्ताने महाराष्ट्रभर अठरा तास अभ्यास उपक्रम राबवला जात आहे. राज्यातील विविध भागातील विद्यार्थी आणि शिक्षकांचा या उपक्रमाला प्रतिसाद मिळतोय. सलग 18 तास अभ्यास करून बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी अनेक विद्यार्थी पुढे सरसावले आहेत. अकोल्याच्या शिवाजी महाविद्यालयात आणि खामगावच्या टिळक विद्यालयात या उपक्रमाला सुरवात झाली. विद्यार्थ्यांनी अठरा तास सतत अभ्यास केला . खामगावच्या टिळक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सकाळी नऊ वाजेपर्यत अभ्यास करुन डाँ. आंबेडकरांना आदरांजली वाहिली. सोलापुरातही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 128 विद्यार्थ्यांनी सलग अठरा तास अभ्यास केल्याचं संयोजक डॉ. औदुंबर म्हस्के यांनी सांगितलं. अशा उपक्रमांमुळे बाबासाहेबांच्या विचारांना खर्‍या अर्थाने चालना मिळाली आहे. तसंच या उपक्रमात सहभागी होऊन शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी वेगळ्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली वाहिली.चंद्रकांत शहासनेंसारखे लेखक आंबेडकरांची विचारधारा अभ्यासून त्यांच्यावर गाथा लिहित आहेत. आपल्या लिखाणातून ते आंबेडकरांना एकप्रकारे आदरांजलीच अर्पण करत आहेत. खरं तर चंद्रकांत सरकारी अधिकारी. स्वातंत्र्यसंग्रामाचा अभ्यास करताना डॉ. आंबेडकरांचं चरित्र त्यांच्या वाचनात आलं. यातूनच त्यांना आंबेडकरांची गाथा लिहायची कल्पना सुचली. आजवर आंबेडकरांवर बर्‍याच लोकांनी लेख, पुस्तकं लिहिली आहेत. पण काव्याच्या माध्यमातून येणारी ही गाथा पहिलीच. ही संपूर्ण गाथा शहासनेंनी ओव्यांच्या स्वरुपात लिहिली आहे. डॉ. आंबेडकरांच्या बालपणापासून त्यांचा आयुष्यप्रवास या चरित्रात मांडण्यात आला आहे. सध्या नालंदा बुद्धविहारात या गाथेचं सामुदायिक वाचन करण्यात येतंय. त्यामुळे आंबेडकरांचं हे ओवीबद्ध चरित्र निश्चितच वेगळा प्रयोग म्हणावा लागेल.दलितांना जगण्याचा हक्क मिळवून देणारे, समाजात सन्मानाचं स्थानमिळवून देणारे दलितांचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या जन्मदिवशी त्यांच्या कार्याला आणि विचारांना मानवंदना देण्यासाठी नागपूर दिक्षाभूमीत जनसागर उसळला आहे. इथे मोठ्या संख्येने बैध्द अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थींच दर्शन घेण्यासाठी जमले आहेत. बाबसाहेव आंबेडकर एक ऐतिहासिक पुरुष आहेत. त्यांनी आमच्यसाठी एक नवीन धारा तयार करुन दिली अशी आदरभावना रविकांत पाटील या अनयायाने यावेळी व्यक्त केली. __PAGEBREAK__ तर बाबसाहेबांचे सहकारी सदानंद फुलझेले यांनी बाबसाहेबांची महती यावेळी सांगितली. बाबासाहेबांचं महत्व कळलं ते 1935 साली. त्यांनी राउन्ड टेबल कॉनफरन्समध्ये इंग्रजांना सांगितलं की, तुम्ही आमच्या देशातून जा आम्ही आमचे प्रश्न सोडवू आणि तेव्हाच महात्मा गांधीनाही त्यांची महानता कळली. बाबासाहेबाचा जन्म 14 एप्रिल 1891 ला झाला. उच्च शिक्षण घेउन त्यांनी आपलं जीवन समाजाच्या उन्नतीसाठी अर्पण केलं. हिंदू धर्मात जन्माला आलो असलो तरीही हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा त्यांनी 1935 साली केली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धर्मात प्रवेश केला. नंतर 20 वर्षं बौध्द धर्माचा अभ्यास करुन त्यांनी दिक्षा घेतली. नागपूरची ही दिक्षाभूमी बौद्धांचं तिर्थक्षेत्र म्हणून जगाच्या पाठीवर गणली जाऊ लागली. आंबेडकरांचे विचारही चिरकालीन ठरले. नागपूराच्या कार्यकर्त्यांवर बाबासाहेबांच्या विश्वास होता. त्यामुळेच त्यांनी इथे शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली होती. त्याच विश्वासाचं पालन त्यांचे कार्यकर्ते आणि सहकारी आजही करताहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला औरंगाबादमधील भडल गेट इथे बासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकर अनुयायी एकत्र आले आहेत. पुतळ्यासमोर त्यांनी आंबेडकर जलसे साजरे केले. डॉ. बाबसाहेब आंबडेकर यांची 118 वी जयंती साजरी करण्यासाठी मुंबईच्या चैत्यभूमीवर एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. इथे बाबसाहेबांच्या अनुयायांनी त्यांना सांगितीक आदरांजली वाहिली.भारतीय राज्यघटनेत प्रत्येक व्यक्तीच्या हक्काचं संरक्षण करणार्‍या या महामानवाच्या विचारांचं आणि कार्याचं स्मरण करून राज्यात विविध प्रकारे आंबेडकर जयंती साजरी करण्यात येत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 14, 2009 11:26 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 14, 2009 11:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close