S M L

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. राम शेवाळकर यांचं निधन

4 मे , नागपूर आपल्या रसाळ वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्घ करणारे वक्ते आणि ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य राम शेवाळकर यांचं हृदयविकाराने निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. रविवारी संध्याकाळी नागपूर मधल्या अंबाजरी घाटावर राम शेवाळकार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी केंद्रीय उर्जा मंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी सरसंघचालक के.सी. सुदर्शन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. पणजीत झालेल्याअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. तसंच विदर्भ साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात पहिल्यांदाच आदिवासी भागात साहित्य संमेलन झालं होतं. उत्तम वक्ते म्हणून ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. संत साहित्याचाही त्यांचा सखोल अभ्यास होता. ज्येष्ठ संगीतकार ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या अमृताचे धनू या कार्यक्रमासाठी प्राचार्य शेवाळकर यांनी केलेल्या निवदेनानं श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं होतं. पाणियावरी मकरी हे त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. त्रिदल, अग्निमित्र, रूचिभेद, आकाशाचा कोंबा हे त्यांचे लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. प्राध्यापक शेवाळकर यांनी विनोबा भावे यांच्या आचार्य कुलाचे अध्यक्ष म्हणून काम केलं होतं. तर दिवंगत समाजसेवक बाबा आमटे यांच्याशी शेवाळकर यांचे घनिष्ठ संबंध होते. यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी इथल्या कॉलेजमधून त्यांनी आपल्या शिक्षकी पेशाला सुरुवात केली. त्यानंतर नांदेडच्या पिपल्स कॉलेजचे प्राचार्य म्हणून त्यांनी दहा वर्ष काम केलं. मराठी आणि संस्कृत विषय त्यांनी शिकवले.

आईबीएन लोकमत | Updated On: May 4, 2009 04:52 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 4, 2009 04:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close