S M L

'कॉलनी 'चे लेखक सिद्धार्थ पारधेंना 'केशवराव कोठावळे' पुरस्कार

6 मे 'कॉलनी 'पुस्तकाचे लेखक सिद्धार्थ पारधे यांना या वर्षीच्या 'केशवराव कोठावळे' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तर श्री .बा. जोशी यांना 'ग्रंथोपासक' या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हा कार्यक्रम रुईया कॉलेजच्या सभागृहात पार पडला. डॉ.सुभाष भेंडे यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. यंदा कोठावळे पुरस्कारांचं 25 वर्षं असल्यामुळे खासकरून नवीन लिखाण आणि साहित्योपासक मंडळींना हा पुरस्कार देण्याचं एकमताने समितीने ठरवलं. त्यानुसार साहित्यनिमिर्तीत सिद्धार्थ पारधे आणि साहित्याचे व्यासंगी तसंच ग्रंथोउपासक श्री .बा. जोशी यांची नावं प्रामुख्याने सुचवण्यात आली असल्याचं मॅजेस्टिकचे प्रकाशक अशोक कोठावळे यांनी सांगितलं. कॉलनी हे पुस्तक एका खडतर आयुष्याची कहाणी आहे. सिद्धार्थ पारधे यांचं कुटुंब मुंबईत कलानगरच्या फुटपाथवर राहणारं... पण 'साहित्य सहवास'च्या कॉलनीत आल्यानंतर त्यांना मिळालेल्या अनुभवाची शिदोरी म्हणजे हे पुस्तक. या पुस्तकाला मिळालेल्या या सन्मानानिमित्ताने या पुस्तकाची दखल घेतल्याचं समाधान सिद्धार्थ पारधे यांनी यावेळी व्यक्त केलं. 'हा पुरस्कार माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला मिळाल्याचा आनंद आहेच पण या लिखाणामुळे तरूणवर्गातील वाचकांना आणि नवोदित लेखकांना स्फूर्ती मिळेल या उद्देशाने हे पुस्तक लिहिलं आणि ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावं ही इच्छा आहे', असं सिद्धार्थ पारधे यांनी यावेळी सांगितलं. तर ' गंगाजळी या लोकप्रिय संग्रहाचा चौथा भागही प्रकाशित झाला असून तो वाचकांच्या पसंतीस उतरेल 'अशी आशा श्री .बा. जोशी यांनी पुरस्कार स्विकारताना व्यक्त केली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 6, 2009 02:26 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 6, 2009 02:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close