S M L

मनमोहन सिंग यांच्यासह 19 मंत्र्यांनी घेतली शपथ

22 मे युपीए सरकारच्या नव्या पंतप्रधानपदाची शपथ मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी संध्याकाळी राष्ट्रपतीभवनात घेतली. मनमोहनसिंग यांच्यासह 19 मंत्र्यांचा शपथविधी झाला. राष्ट्रपती भवनातल्या अशोक हॉलमध्ये शपथ ग्रहणाचा कार्यक्रम पार पडला. शपथविधी सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीताची धून वाजवण्यात आली. त्यानंतर शपथविधीच्या शानदार सोहळ्याला सुरुवात झाली. प्रथम मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यानंतर प्रणव मुखर्जी, शरद पवार, ए.के. अँटोनी, पी. चिदंबरम, ममता बॅनर्जी, एस. एम. कृष्णा, सुशीलकुमार शिंदे यांनी शपथ घेतली. त्यानंतर गुलाम नबी आझाद, वीरप्पा मोइली, जयपाल रेड्डी, कमलनाथ, वायलर रवी यांना राष्ट्रपतींनी मंत्रीपदाची शपथ दिली. त्यानंतर मीरा कुमार, मुरली देवरा, कपिल सिब्बल, अंबिका सोनी यांच्याबरोबरच बी.के. हंडिक, आनंद शर्मा, सी. पी. जोशी यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. नव्या मंत्र्यांमध्ये 6 माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. तर ममता बॅनर्जी, मीरा कुमार आणि अंबिका सोनी या 3 महिलाही मंत्रिमंडळात आहेत. यूपीएच्या मंत्रीमंडळात वीरप्पा मोईली, एस. एम. कृष्णा, सी. पी. जोशी आणि ममता बॅनर्जी या चार नव्या चेहर्‍यांना यावेळी संधी देण्यात आली आहे. पुढच्या आठवड्यात दुस-या टप्प्यातले शपथविधी होणार आहेत. 2004 ते 2009 या काळात देशाला स्थिर सरकार देणा-या पंतप्रधान मनमोहन सिंग यांची ही दुसरी इनिंग आहे. आज शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि मुरली देवरा यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. ते पाहता महाराष्ट्राच्या वाट्याला तीन मंत्रीपदं आली आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 22, 2009 04:52 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 22, 2009 04:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close