S M L

काँग्रेस-बसपामध्ये धुमश्चक्री : मायावतींनी केली सोनियांवर टिका

16 जुलै, उत्तर प्रदेशमायावती विरूद्ध कॉंग्रेस या जुन्या दुश्मनीचा आज एक नवा अध्याय सुरू झाला. कॉंग्रेसच्या उत्तर प्रदेश प्रमुख रीटा बहुगुणा यांनी वापरलेल्या अपशब्दांवरून मायावतींनी थेट सोनिया गांधींवर जोरदार हल्ला चढवला. हाती आलेल्या आयत्या संधीचा वापर करून उत्तर प्रदेशातली दलित मतं मिळवण्याचा प्रयत्न मायावती करताना दिसतायत. दरम्यान, या प्रकरणी गोंधळ झाल्यामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहातही कोणतंच कामकाज होऊ शकलं नाही.बुधवारी दुपारी रीटा बहुगुणा-जोशी मुरादाबादमध्ये भाषणाला उभ्या राहिल्या. तेव्हा त्यांना कल्पनाही नव्हती की एक राजकीय वादळ त्यांच्या दिशेने घोंघावत येतंय. कॉंग्रेसच्या उत्तर प्रदेश प्रमुख असल्याने त्यांनी मुख्यमंत्री मायावतींवर जोरदार हल्ला चढवला. पण भाषणाच्या ओघात त्या वाहात गेल्या. आणि बोलू नये ते बोलल्या- 'मायावतीवर बलात्कार होऊ द्या, मी एक कोटी देईन'.या आक्षेपार्ह विधानाची प्रतिक्रिया उमटली. थेट लखनऊहून आदेश आल्यामुळे पोलिसही ताबडतोब कामाला लागले. मुरादाबादमधला कार्यक्रम उरकून बहुगुणा दिल्लीच्या दिशेने निघाल्या असताना रात्री साडे बारा वाजता त्यांना दिल्ली- उत्तर प्रदेश सीमेवर गाझियाबादमध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर अर्ध्या तासातच रात्री एक वाजता बहुगुणांच्या लखनऊमधल्या घरावर बसपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. ज्या घरात लोकसभा निवडणुकांसाठी कॉंग्रेसने यशस्वी रणनीती आखली होती ते घर जळून खाक झालं. गुरुवारी सकाळी बहुगुणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनवण्यात आली. त्यांच्यावर इतर कलमांबरोबरच ऍट्रॉसिटी ऍक्टही लावण्यात आलाय. पण एवढं करून मायावती थांबल्या नाहीत. त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन झाल्या प्रकारासाठी थेट सोनिया गांधींना जबाबदार धरलं. या सा-या प्रकाराचा करता करवता धनी सोनिया गांधी आहेत असा आरोपच मायावती यांनी केलाय. मायावती आणि सोनिया गांधी यांच्यातलं राजकीय वैर तसं जुनं आहे. पण आता बहुगुणा प्रकरणात सोनिया गांधींना गोवून कॉंग्रेसची उत्तर प्रदेशातली घोडदौड रोखण्याचा प्रयत्न मायावती करताना दिसतायत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 16, 2009 03:18 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 16, 2009 03:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close