S M L

26/11 च्या हल्लेखोरांवर करा कडक कारवाई - हिलरी क्लिंटन

18 जुलैमुंबईच्या हल्लेखोरांवर कडक कारवाई करा असं अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी पाकिस्तानला ठणकावलं आहे. त्या तीन दिवसांच्या मुंबई दौ-यावर आहेत. 26/11 च्या वेळी मंुबईनं दाखवलेल्या धाडसाला हिलरी यांनी सलाम केला. 26/11 तल्या दोषींवर पाकिस्तान काय कारवाई करतं, हे काळच सिद्ध करेल, असं त्या म्हणाल्या आहेत. शनिवारी सकाळी ताज हॉटेलमध्ये हिलरी यांनी उद्योग जगतातल्या काही मोजक्या मंडळींसह पत्रकार परिषद घेतली. रतन टाटा, मुकेश अंबानी यावेळी उपस्थित होते.त्यानंतर मुंबईतल्या सेंट झेव्हिअर्स कॉलेजमध्ये क्लिंटन यांनी आमीरसोबत एका शैक्षणिक कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यांनी अभिनेता आमीर खानचं कौतुक केलंय. शिक्षणासाठी आमीर राबवत असलेल्या टिच इंडिया या उपक्रमाचं हिलरींनी कौतुक केलं. भारतातलं शिक्षण दर्जेदार आहे. पण पायाभूत सुविधांचा अभाव असल्यानं लाखो भारतीय मुलं शिक्षणापासून वंचित असल्याचं त्या म्हणाल्या. हिलरींच्या या दौ-यादरम्यान त्यांच्यासमोर कुणी निदर्शनं करु नयेत तसंच अमेरिका आणि त्याच्या परराष्ट्र धोरणाच्या विरोधात कुणी लिखाण करु नये याची खबरदारी सरकारनं घेतलीय. त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी दोघा सामाजिक कार्यकर्त्यंना शुक्रवारी रात्री ताब्यात घेतलं होतं. सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठीबोरवाला आणि किशोर जगताप या दोघांना अंधेरीच्या एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. आता त्यांना सोडण्यात आलंय. पण ही सुटका करतानाही या दोन्ही कार्यकर्त्यांना, ताब्यात घेण्यामागची कारणं सांगण्यात आली नाहीत. आयबीएन लोकमतने शनिवारी सकाळपासून या बातमीचा पाठपुरावा केला, त्याबाबतीत विविध मान्यवरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. कोणतंही कारण न देता, अचानकपणे केवळ एका मंत्र्यांच्या आगमनापूर्वी अशा प्रकारे कोणालाही ताब्यात घेणं म्हणजे, पोलिसांची दंडेलशाही असल्याचं मत व्यक्त होतंय. लिखाण, विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे हक्क आपल्याला घटनेने दिलेत, तेव्हा अशा पद्धतीने पोलिसांनी कोणतही कारण न देता ताब्यात घेणं चुकीचं असल्याच्याही प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 18, 2009 04:03 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 18, 2009 04:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close