S M L

कोल्हापूर पोलिसांकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न

5 डिसेंबर देशाची घटना धर्मनिरपेक्ष आहे. त्यामुळे या देशामध्ये धर्मनिरपेक्षता-वादाला कोणी हात लावू शकत नाही. ती बदलण्याचा प्रयत्न करू पाहणार्‍या धर्माच्या ठेकेदारांना हद्दपार करा, असं मत IBN-लोकमतचे संपादक निखील वागळे यांनी व्यक्त केलं. कोल्हापुरात आयोजित केलेल्या धर्मनिरपेक्षता युवा निर्धार परिषदेत त्यांनी हे मत मांडलं. या परिषदेला युवकांनी मोठी गर्दी केली होती. कोल्हापुरातल्या केशवराव भोसले नाट्यगृहात ऑल इंडीया स्टुडंटस् फेडरेशन आणि अखिल भारतीय नौजवान सभेच्या वतीनं धर्मनिरपेक्षता युवा निर्धार या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्राला भविष्य घडवायचं असेल तर युवकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहनही निखिल वागळे यांनी केल. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी निखिल वागळे कोल्हापूरच्या एअरपोर्टवर येताच त्यांना पोलिसांनी शिवसेनेच्या धमकीचं कारण सांगित चक्क 149 ची नोटीस बजावली. गोंधळ होण्याच्या शक्यतेने कार्यक्रमाला उपस्थित राहू नका असंही सांगितलं. त्यावरून दाभोळकर आणि कॉ. गोविंद पानसरेंनी पोलिसांचा चांगलाच समाचार घेतला. या परिषदेला कामगारमंत्री हसन मुश्रीफ, तसंच ऑल इंडीया स्टुडंटस् फेडरेशन आणि अखिल भारतीय नौजवान सभेचे विद्यार्थी उपस्थित होते. शिवसेनेनं धमकी दिल्यानंतर आणि पोलिसांनी दबाव आणूनही ही परिषद उत्साहात आणि सुरळीत पार पडली. युवकांनी मोठ्या संख्येनं या परिषदेला हजेरी लावली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 5, 2009 10:48 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 5, 2009 10:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close