S M L

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात स्वतंत्र विदर्भ समर्थकांची घोषणाबाजी

6 जानेवारी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी माजी खासदार जांबुवंतराव धोटे आणि खासदार विलास मुत्तेमवार यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमांत घोषणाबाजी केली. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचा कार्यक्रम जांबुवंतराव धोटे यांनी त्यांच्या समर्थकांनी होऊच दिला नाही. मुख्यमंत्र्यानी जांबुवंतराव धोटे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर हा कार्यक्रम सुरू झाला. तर यशवंत स्टेडियम इथे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या स्वागत समारंभात मुत्तेमवार समर्थकांनी घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासमोर विलास मुत्तेमवार यांनी स्वतंत्र विदर्भाची मागणी केली. तसंच मुत्तेमवार यांचा सत्कार न केल्याने कार्यकर्ते संतापले होते. नंतर स्वतंत्र विदर्भाच्या घोषणाही मुत्तेमवार समर्थकांनी दिल्या. नागपुरात यशवंत स्टेडियम इथे मुख्यमंत्र्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जांबुवंत राव धोटे यांनी मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 6, 2010 01:29 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 6, 2010 01:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close