S M L

राहुल यांना काळे झेंडे दाखवा- शिवसेनाप्रमुख

4 फेब्रुवारीउद्या मुंबईच्या दौ-यावर येणारे काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवून निषेध करा, असे आदेश शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांना दिले आहेत. उद्या मुंबईत होणा-या 2 कार्यक्रमांना राहुल गांधी हजेरी लावणार आहेत. सकाळी 10 वाजता पार्ले इथल्या भाईदास हॉलमध्ये राहुल विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर रमाबाई आंबेडकर नगरमध्ये ते विद्यार्थी आणि नागरिकांशी संवाद साधणार आहेत. एकूण 3 तासांचा हा दौरा असणार आहे. 26/11च्या हल्ल्याच्या वेळी मुंबईचे रक्षण युपी आणि बिहारी कमांडोनी केले, असे वक्तव्य नुकतेच राहुल यांनी बिहारमध्ये केले होते. त्याला शिवसेनेने तीव्र आक्षेप घेतला होता. कामटे, साळस्कर, ओंबळे या मराठी शहिदांचा राहुल यांनी अपमान केला आहे, असा आरोप सेनेने राहुल यांच्यावर केला आहे. आता याच मुद्द्यावरून शिवसेनाप्रमुखांनी आंदोलनाचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने राहुल यांच्या दौ-यासाठी अतिशय चोख बंदोबस्ताची तयारी केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काहीजणांना ताब्यातही घेतले जाऊ शकते, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान राहुल गांधींना पूर्णपणे सुरक्षा देण्यात येईल, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले आहेत. तर राहुल गांधींच्या मुंबई दौ-याला केला जाणारा विरोध मोडून काढलाजाईल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 4, 2010 11:52 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 4, 2010 11:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close