S M L

सेना-मनसेला निवडणुका लढवण्यास बंदी घाला- राणे

4 फेब्रुवारीमुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यापाठोपाठ महसूलमंत्री नारायण राणे यांनीही शिवसेना आणि मनसेवर 'प्रहार' केलाय. या पक्षांना निवडणूक लढवता येऊ नये म्हणून कायदा केला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. या दोन्ही पक्षांमुळे देशात महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत आहे, अशी टीका राणेंनी केली आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत त्यांनी सेनेने सुरू केलेल्या मराठीच्या आंदोलनाचा खरपूस समाचार घेतला आहे. मराठी माणसाचे सगळे हक्क शाबूत राहतील याची काळजी सरकार घेत आहे. कुठलाही मराठी माणूस मुंबई महाराष्ट्रापासून दूर होऊच देणार नाही. केवळ राजकारणासाठी या पक्षांनी हा अस्मितेचा उद्योग सुरु केला आहे. शिवसेनेचा मराठी माणसाची आर्थिक उन्नती करण्यासाठी काय कार्यक्रम आहे? असा सवालही राणेंनी यावेळी उपस्थित केला. तर संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन आणि उध्दव ठाकरेंचा संबंध काय? असा थेट सवाल करत मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला तेंव्हा उध्दव मातोश्रीवर लपून बसले होते, असा आरोपही त्यांनी केला. शिवसेना आता कमजोर झाली आहे, स्वत:चे नरडे सांभाळण्याची कुवत शिवसेनेत राहिली नाही. ती दुस-याच्या नरडीचा काय घोट घेणार? अशी खरमरीत टीका त्यांनी शिवसेनेवर केली.सामनातून वादग्रस्त लिखाण करणारे सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरही राणेंनी तीव्र टीका केली आहे. राऊत हे सेनेचे पगारी नेते आहेत. त्यांनी जे लिहिले आहे, त्याची चौकशी सध्या आमचा विधी विभाग करत आहे. त्यांची चौकशी पूर्ण झाल्यावर आम्ही योग्य ती कारवाई करूच असेही राणे यावेळी म्हणाले. मी झेंडा सिनेमाला विरोध केलेला नाही. स्वाभिमान संघटना माझ्या मुलाची आहे. मी त्याचा पदाधिकारी नाही, असे उत्तर त्यांनी यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला दिले.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 4, 2010 01:24 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 4, 2010 01:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close