S M L

'आम आदमी' झाला 'लोकल'!

5 फेब्रुवारीशिवसेनेचे आव्हान स्वीकारत मुंबईत दाखल झालेला काँग्रेसचा 'आम आदमी' अर्थात राहुल गांधी आज ख-या अर्थाने 'लोकल' झाले. सुरक्षेचा वगैरे बडेजाव झुगारत राहुल गांधींनी थेट मुंबईकरांनी लाईफलाईन लोकल ट्रेन गाठली... आणि अंधेरी ते दादर असा लोकल ट्रेनचा प्रवास करत मुंबईकरांशी नाळ जोडली. भाईदासमध्ये राहुल गांधींनी तरूणांशी संवाद साधल्यानंतर नियोजनाप्रमाणे पुढचा कार्यक्रम होता घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरात. राहुल यांच्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात येणार होती. ती नाकारून त्यांनी कारने प्रवास करण्याला पसंती दिली. मात्र भाईदास सभागृहाबाहेर आल्यानंतर राहुल यांच्या मनात वेगळीच कल्पना आली. त्यांनी प्रवासाचा मार्ग बदलला. मुंबईकर ज्या रेल्वेनं प्रवास करतात त्या रेल्वेतून राहुल यांनी प्रवास करायचे ठरवले. रेल्वेला ही माहिती केवळ 4 मिनिटे अगोदर देण्यात आली.गाड्यांचा ताफा अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ आला. तिथे राहुल गांधींनी एका बँकेच्या एटीएममधून पैसेही काढले. रितसर फर्स्ट क्लासचं तिकीटही काढले. त्यानंतर खाजगी सुरक्षारक्षक, पोलीस आणि जीआरपीच्या पोलिसांबरोबर त्यांच्या रेल्वे प्रवासाला सुरूवात झाली. सर्वसामान्यांप्रमाणंच राहुलचा रेल्वेतून प्रवास सुरु होता. सेनेच्या आंदोलनाला आणि धमकीला न जुमानता...अंधेरीहून निघालेली लोकल दुपारी 1 वाजून 29 मिनिटांनी दादर पोहचली...दरम्यानच्या प्रवासात राहुल यांनी प्रवाशांनी गप्पा मारत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गाडी दादरला आली...गर्दीनं भरलेला दादरचा रेल्वेपूल ओलांडून त्यांनी मध्य रेल्वेचा चौथ्या क्रमांकाचा प्लॅटफॉर्म गाठला. अनेकांशी हस्तांदोलन, तर कुणाला नमस्कार असे सोपस्कार पार पाडत, त्यांनी दहा मिनिटे दादरच्या स्टेशनवर काढली. राहुल गांधीला रेल्वे स्टेशनवर पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. दादरला असलेल्या गर्दीत धक्काबुक्की सहन करत राहुल यांनी घाटकोपरला जाण्यासाठी कल्याण फास्ट ही लोकल पकडली...दादर ते घाटकोपर हा प्रवास मात्र राहुल गांधींना उभा राहून करावा लागला. घाटकोपरला उतरल्यानंतर राहुलचा ताफा सुसाट वेगाने रमाबाई आंबेडकर नगरच्या दिशेने गेला. रेल्वे प्रवासातल्या आठवणी मनात जपत राहुल गांधींनी त्यांचा पुढचा प्रवास सुरु केला...

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 5, 2010 09:08 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 5, 2010 09:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close