S M L

धुळवडीची धमाल

1 फेब्रुवारीकाल होळी धुमधडाक्यात साजरी झाल्यानंतर आज देशभरात धुळवडीची धमाल सुरू आहे. लहान, मोठे, वृद्ध, सगळेच या जल्लोषात सामील झाले आहेत. मुंबईकर न्हाले रंगातसलग तिसर्‍या दिवसाची सुट्टी आज मुंबईकरांनी धुळवडीच्या रंगात न्हाऊन साजरी केली. धुलीवंदनाचे रंग खेळण्यासाठी आबालवृद्ध सकाळपासून रस्त्यावर उतरले. नेहमीप्रमाणे बॉलीवूडने मोठ्या जल्लोषात धुळवड साजरी केली. तर मराठी आणि भोजपुरी सिनेकलाकारांनीही चिंब भिजत धुळवड साजरी केली.पवईतील हिरानंदानी इथे भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांनी धुळवड साजरी केली. तर अमिताभच्या प्रतीक्षा बंगल्याबाहेरही चाहत्यांनी धूलिवंदनासाठी मोठी गर्दी केली. दादरला शिवाजी पार्क इथे मराठी कलाकारांनी धुळवड साजरा केली. राजकारणी रंगले रंगातएरवी एकमेकांवर आरोपांची चिखलफेक करणारे राजकारणीही आज धुळवडीच्या रंगात रंगले. मनसेने घाटकोपर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार रमेश वांजळे आणि राम कदम यांनी रंग उधळून धमाल केली. काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंग यांनीही मोठ्या जोशात धुळवड साजरी केली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनीही दिल्लीत बच्चेकंपनीसोबत होळी साजरी केली.मथुरेतही आज होळी धुमधडाक्यात साजरी झाली. रंगांची उधळण करत मथुरावासियांनी जणू श्रीकृष्णाची रासलीला अनुभवली. राज्यात सर्वत्र धमालपुण्यात सकाळपासूनच जल्लोष करत तरुणाईने धूलिवंदन साजरे केले.नागपुरात रंग उधळत डीजेच्या तालावर नाचणार्‍या छोट्या कंपनीसोबत मोठ्यांनीही ताल धरला. विशेष म्हणजे येथे कोरडे आणि नैसर्गिक रंग खेळत धुळवड साजरी करण्यात आली. अकोल्यात धुळवड जरा हटके साजरी झाली. ज्येष्ठ नागरिकांचे केस डाय करुन इथे धुळवड साजरी करण्यात आली. जळगाव आणि औरंगाबादमध्येही धूलिवंदनाच्या शुभेच्छा लहान-थोरांनी एकमेकांवर रंगाची उधळण केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 1, 2010 10:16 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2010 10:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close