S M L

टिंग्याचे शिक्षण होणार बंद

2 फेब्रुवारी'टिंग्या' फेम शरद गोयेकरचे शिक्षण आता बंद होण्याची शक्यता आहे. शरदच्या शिक्षणाचा खर्च उचलणार्‍या पुण्यातील पाटील दाम्पत्याने, आता शरदच्या शिक्षणासाठी खर्च न करण्याचा निर्णय घेतला आहे. शरदच्या वडिलांच्या मनमानीला कंटाळून आपण हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावर ''माझ्या केवळ शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी पाटील दाम्पत्याने घेतली होती. पण ते माझे जाहीर कार्यक्रम घेतात आणि त्यातील पैसे माझ्या वडिलांना द्यायला नकार देतात. माझे नाव बदलून मोहीत पाटील ठेवावे असा त्यांचा आग्रह आहे. वडिलांसोबत जाण्यासाठीही त्यांची परवानगी घ्यावी लागते. माझे वडील मोलमजुरी करतात. माझ्या कार्यक्रमातील निम्मे पैसे मिळावेत ही त्यांची मागणी योग्य आहे. शिवाय निम्मे पैसे माझ्या नावावर बँकेत ठेवले जावेत, असेही त्यांचे म्हणणे आहे,'' असे शरद गोयेकरने 'आयबीएन-लोकमत'शी बोलताना स्पष्ट केले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 2, 2010 09:41 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 2, 2010 09:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close