S M L

साहित्य संमेलनासाठी सचिन आणि अमिताभला निमंत्रण

2 फेब्रुवारीपुण्यात होणार्‍या 83व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी जोरदार तयारी सुरू आहे. या संमेलनासाठी सचिन तेंडुलकर आणि अमिताभ बच्चनला निमंत्रण देण्यात येणार आहे. हे संमेलन मार्च महिन्याच्या अखेरीस पुण्यात होणार आहे. यासाठी या दोन्हीही दिग्गजांना उद्या निमंत्रण देण्यात येणार आहे.ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर, ना. धों. महानोर आणि मंगेश पाडगावकर यांचा या संमेलनात सहभाग असणार आहे. विंदांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे, तर महानोर कवी संमेलनाचे अध्यक्ष असतील. मंगेश पाडगावकर लहान मुलांसाठी विशेष कार्यक्रम घेणार आहेत. 26 मार्च या उद्घाटनाच्या दिवशी परिसंवाद आणि कवी संमेलन आहे.द. मा. मिरासदार यांचे कथाकथन, श्याम मनोहर आणि मेघना पेठे यांची प्रकट मुलाखत, ज्येष्ठ साहित्यिक ज्योत्स्ना देवधर आणि उत्कर्ष प्रकाशनाचे सु. वा. जोशी यांचीही मुलाखत होणार आहे. लिलाधर हेगडे, शाहीर साबळे, आत्मराम पाटील या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील शाहिरांचा सत्कारही यावेळी करण्यात येणार आहे.3 दिवसांच्या काळात वेगवेगळ्या विषयांवरील 10 परिसंवादांचेही आयोजन करण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 2, 2010 10:05 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 2, 2010 10:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close