S M L

आशाताईंच्या वक्तव्यावरून राजकारण

3 फेब्रुवारीमराठी माणसाबद्दल ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी व्यक्त केलेल्या मतांवरून आता राजकारण सुरू झाले आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला आहे. तर आशाताईंच्या भूमिकेला मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पाठिंबा दर्शवला आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात हिंदुस्थान सगळ्यांचा आहे, असे वक्तव्य आशाताईंनी केले होते. भारत हा सगळ्यांचा देश आहे. भारतात कोणी कुठे राहायचे, काय काम करायचे याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मग तो महाराष्ट्रीय असो वा उत्तर भारतीय. जो कष्ट करणार त्यालाच पैसे मिळणार, असे त्या यावेळी म्हणाल्या. तसेच मराठी माणूस कष्ट करण्यात मागे पडतो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे राज ठाकरे यांनी आशाताईंच्या मराठी असण्याबद्दल आपल्या भाषणातून अभिमान व्यक्त केला होता. त्यामुळे आशाताईंचा हा टोला राज ठाकरेंनाच होता, असे मत व्यक्त झाले होते. याबाबत उद्धव ठाकरें यांना विचारले असता, 'तेथे जे उपस्थित होते त्यांनाच विचारा' अशी मिश्किल प्रतिक्रया देत उद्धव ठाकरे यांनी राज यांना अप्रत्यक्षरित्या टोला मारला. तर दुसरीकडे आशाताईंच्या वक्तव्याला मुख्यमंत्र्यांनी आज पाठिंबा दर्शवला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 3, 2010 09:41 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 3, 2010 09:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close