S M L

दुसरे विश्व मराठी साहित्य संमेलन उद्यापासून दुबईत

3 फेब्रुवारीदुबईमध्ये उद्या दुसर्‍या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.भारतीय प्रमाण वेळेनुसार उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता हा सोहळा सुरू होईल. संमेलनाचे अध्यक्ष कविवर्य मंगेश पाडगावकर उद्या दुबईत दाखल होत आहेत. त्यांच्यासह निमंत्रित साहित्यिक आणि मराठी रसिकही या संमेलनासाठी जात आहेत. अमेरिकेतल्या सॅनफ्रॅन्सिको इथे गेल्या वर्षी पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन झाले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे या संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यानंतर आता मंगेश पाडगावकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होत आहे. विद्यमान अध्यक्षाकंडून नव्या अध्यक्षांना सूत्रे प्रदान करण्याची परंपरा विश्व मराठी साहित्य संमेलनातून रद्दबातल ठरविण्यात आली आहे. मंगेश पाडगावकर यांची प्रकट मुलाखत, कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद आणि दुबईची सफर असे भरगच्च कार्यक्रम चार ते सहा मार्च या काळात होणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 3, 2010 03:36 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 3, 2010 03:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close