S M L

दुबईतही मानापमान!

5 फेब्रुवारीमराठी साहित्य संमेलन आणि त्यानिमित्ताने रंगणारे वाद हे मराठी माणसाला नवे नाहीत. किंबहुना एखाद्या वर्षी वाद झालाच नाही तर साहित्यप्रेमींना चुकल्या चुकल्यासारखे वाटेल. गेल्या वर्षी मात्र तर या वादाला नवाच विषय मिळाला. तो म्हणजे हे मराठमोळे संमेलन चक्क परदेशी नेण्याचा! त्यावरून झालेली टीका साहित्य महामंडळाने अक्षरश: 'मनाचा दगड' करून सहन केली. आणि संमेलन 'वैश्विक' केल्याची कृतार्थता अनुभवली.चला, आता परक्यांच्या दारात तरी 'शोभा' होणार नाही, म्हणून साहित्यरसिकांच्या जीवाला समाधान वाटले. पण आता हे समाधानही काही विघ्नसंतोषी लोकांना पाहवत नसावे. म्हणूनच की काय, साहित्य महामंडळाने आपल्या निमंत्रितांचा अपमान केला म्हणून दुसर्‍या मराठी विश्वसाहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष धनंजय दातार रुसून बसले आहेत.एवढ्यावरच न थांबता त्यांनी पत्रकार बोलावून चारचौघात साहित्य महामंडळावर तोंडसुखही घेतले आहे. दुबईतील महाराष्ट्र मंडळाने लेखी कराराचा भंग केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच साहित्य महामंडळाने अपमान केल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. दातारांचा संताप व्यक्त होण्यासाठी निमित्त मिळाले, एका नृत्याच्या कार्यक्रमाचे. संमेलनाच्या आयोजनासाठी आपले तन, मन, धन खर्च करणारे दातार आणि त्यांच्या अल् आदिल कंपनीने पाहुण्यांच्या सरबराईत काहीही उणे राहणार नाही याची काळजी घेतली. एवढे करताना त्यांनी फक्त एकच छोटी अट ठेवली होती. आणि ती म्हणजे संमेलनात रंजना फडके यांना नांदी नृत्य सादर करू देण्याची. पण आयोजकांनी हा नृत्याच्या कार्यक्रम ऐनवेळी रद्द करून टाकला. आणि संमेलन संपण्याअगोदर धनंजय दातार यांच्या संतापाचा स्फोट झाला. याबाबत 'आयबीएन-लोकमत'शी बोलताना दातार यांनी गंभीर आरोप केले. या कार्यक्रमासाठी मी लाखो रुपये खर्च केले. पण माझ्या अल् आदिल कंपनीचा साधा बोर्ड किंवा झेंडे लावण्याचे सौजन्य आयोजकांनी दाखवले नाही. दीड महिन्यापूर्वीच कार्यक्रमाची रुपरेषा ठरवताना फडके यांच्या नृत्याच्या कार्यक्रमाचा कार्यक्रम पत्रिकेत समावेश केला गेला. पण ऐन वेळी महामंडळाच्या अध्यक्षांनी कार्यक्रम पत्रिकेत बदल केला. आणि हे नृत्य कार्यक्रमाच्या शेवटी ठेवण्यात आले. शेवटी तर ते रद्दच करण्यात आले. याउलट नियोजनात नसतानाही नेत्यांची लांबलचक, वेळखाऊ भाषणे मात्र झाली. त्यामुळे मुंबईवरून आलेल्या फडके अतिशय नाराज झालेल्या आहेत. त्यांनी कालपासून जेवणही केलेले नाही. हा दुबईतील मराठी जनतेचा अपमान आहे, असा उद्वेग दातार यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय आखातात 70 हजार मराठी लोक राहतात. त्यांना तिकीटेच मिळाली नाहीत. त्यामुळे संमेलनाला गर्दीही होऊ शकली नाही. तिकीटविक्रीची जबाबदारी गेल्या वर्षीच्या स्वागताध्यक्षांकडे दिली गेली होती. त्यांनी गेल्या वर्षीच्या अपमानाचे उट्टे काढायचे म्हणून तिकीटविक्रीच केली नाही, असा आरोपही दातार यांनी केला आहे. दुबईतून येऊन राष्ट्रपतींपासून, मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांना प्रेमाने संमेलनाचे निमंत्रण देणारे धनंजय दातारांचे फोटो सर्वच मराठी वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले. त्यामुळे ओळखीचे झालेले दातार यांच्या अपमानाचे शल्य मराठी रसिकांनाही टोचणार आहे. आता या सगळ्या तापलेल्या वातावरणात उद्या संमेलनाची सांगता होणार आहे. संमेलनासाठी दुबईत आलेल्या महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठालेपाटलांसह दुबईत मोठ्या प्रेमाने स्वागत झाले. दुबईतून त्यांना निरोपही तेवढ्याच प्रेमाने मिळावी एवढीच अपेक्षा आता तमाम मराठी जनता करते आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 5, 2010 03:07 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 5, 2010 03:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close