S M L

अमिताभ यांनी निमंत्रण स्वीकारले

5 फेब्रुवारीपुण्यात होणार्‍या 83 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण अभिनेते अमिताभ बच्चन यांनीस्वीकारले आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष सतीश देसाई यांनी ही माहिती दिली. या संमेलनासाठी अमिताभ आणि सचिन तेंडुलकरला निमंत्रण देण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. या दोघांचेही वडील साहित्यिक होते. आपल्या वडिलांच्या कवितेच्या किंवा साहित्याच्या चार ओळी जरी त्यांनी म्हणून दाखवल्या, तरी साहित्यप्रेमींमध्ये आणि विशेषत: युवकांमध्ये योग्य संदेश जाईल. तसेच या त्यानिमित्ताने संमेलनही ग्लोबल होईल, असेही देसाई यांचे म्हणणे आहे. आयोजकांच्या विनंतीला साहित्यप्रेमी असणार्‍या अमिताभ यांनी मान दिला आहे. तर निमंत्रण मिळाल्यावर निर्णय घेईन, असे सचिनही एका कार्यक्रमात म्हणाला होता. तोही निश्चितच होकार देईल, असा ठाम विश्वास आयोजकांना वाटत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 5, 2010 03:21 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 5, 2010 03:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close