S M L

काम मानवी कल्याणाचे

8 फेब्रुवारीमानवी कल्याणासाठी काम केल्याबद्दल भारतातील 4 महिला उद्योजकांची फोर्ब्जच्या एशिया पॅसिफिकसाठीच्या 48 जणांच्या यादीत निवड करण्यात आली आहे. त्यात 'अरघ्यम'च्या संस्थापक रोहिणी नीलकेणी यांचा समावेश आहे. 'अरघ्यम'चे काम सुरू आहे पाणीप्रश्नावर. कर्नाटकसोबत तब्बल 17 राज्यांमध्ये या संस्थेच्या माध्यमातून नीलकेणी यांचे काम सुरू आहे. प्रत्येक घराला पुरेसे आणि स्वच्छ पाणी मिळावे यासाठी 'अरघ्यम' काम करते. पाणी हा विषय लिंगभेदाशी जोडलेला आहे. कारण पाण्याशी संबंधित बहुतेक कामे महिलाच करतात. त्यामुळे शुद्ध पाण्याविषयी महिलांमध्ये जाणीव निर्माण करण्याचे काम त्यांनी सुरू केले. इन्फोसिसचे नंदन नीलकेणी यांच्या पत्नी अशी सुरुवातीला रोहिणी यांची ओळख होती. पण या कामाने त्यांना स्वतंत्र ओळख झाली आहे. या कामासाठी त्यांनी माध्यम वापरले ते पुस्तकाचे. प्रथम बुक उपक्रम या कार्यक्रमातून त्यांनी मुलांना कमी किंमतीतील पुस्तके देण्यास सुरुवात केली. गेल्या 6 वर्षात 'प्रथम'ची 180 पुस्तके 10 भाषांमध्ये प्रकाशित झाली आहेत. आणि ती लाखो मुलांच्या हातात पडली आहेत. एवढ्यावरच न थांबता रोहिणी यांनी आतापर्यंत शिक्षण, आरोग्य व पर्यावरणाच्या रक्षणासाठी 4 कोटी डॉलर्सची मदत केली आहे .

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 8, 2010 03:09 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 8, 2010 03:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close