S M L

आता वाद सूत्रे स्वीकारण्याचा

24 मार्चपुणे इथे होणार्‍या 83 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष द. भि. कुलकर्णी यांना सूत्र प्रदान करण्याच्या मुद्द्यावरून आता वाद उभा राहिला आहे. संमेलनाच्या अध्यक्षांकडूनच नवनिर्वाचित अध्यक्ष सूत्र स्वीकारण्याची घटनात्मक तरतूद आहे. पण मागील संमेलनाचे अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी कुलकर्णी यांच्याकडे सूत्रे सुपूर्द करावीत, अशा हालचाली सुरू झाल्या आहेत. महामंडळाच्या गुरुवारी पुण्यात होणार्‍या बैठकीत याबाबतचा ठराव मांडला जाणार आहे. 'दोघांकडून सूत्रे स्वीकारू'तर साहित्य संमेलनात अध्यक्षांनी सूत्रे स्वीकारणं हे कर्मकांड आहे. म. द. हातकणंगलेकर आणि आनंद यादव या दोघांकडून पुणे संमेलनाची सूत्रे स्वीकारणे आपल्याला आवडेल, असे अध्यक्ष द. भि. कुलकर्णी यांनी म्हटले आहे. शिवाय गेल्या वेळचे अध्यक्ष आनंद यादव यांचाही उचित सन्मान करावा, असेही ते म्हणाले आहेत.संमेलनाचे अध्यक्षपद म्हणजे सत्ता नसलेली वाड्.मयीन सद्सदविवेकबुध्दी आहे. संमेलनाच्या निवडणुकीत दोन नंबरची मते पडलेल्या उमेदवाराला शाखा संमेलनाचे अध्यक्ष करावे. संमेलनाचा अध्यक्ष निवडून आला असल्याने त्याला नियोजित अध्यक्ष न म्हणता निर्वाचित अध्यक्ष म्हणावे, अशा सूचनाही द. भि. यांनी केल्या आहेत. तर आगामी संमेलनापासून संमेलनातील कार्यक्रम ठरवताना संमेलनाध्यक्षालाही सहभागी करून घ्यावे, असे मतही त्यांनी मांडले आहे. अर्थात आपली ही मागणी नाही अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे. द. भि. यांना काय अधिकार?द. भि. कुलकर्णी यांची ही मते साहित्य महामंडळाला मात्र पटलेली नाहीत. अध्यक्षपदाची सूत्रे कुणाकडून स्वीकारायची हे ठरविण्याचा अधिकार त्यांना नाही. तर तो महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांना आहे, असे महामंडळाचे कार्यवाह के. एस.आतकरे यांनी म्हटले आहे.त्यामुळे आता यावरून नवाच वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 24, 2010 01:42 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2010 01:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close