S M L

संमेलन नगरीला विंदांचे नाव

25 मार्च पुण्यात होत असलेल्या 83 व्या साहित्यसंमेलनातील संमेलन नगरीला कवीश्रेष्ठ विंदा करंदीकरांचे नाव देण्यात आले आहे. तसेच मुख्य मंडपाला यशवंतराव चव्हाण यांचे तर दुसर्‍या मंडपाला आचार्य अत्रेंचे नाव देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. संमेलन नगरीच्या 3 प्रवेशद्वारांना अनुक्रमे कुसुमाग्रज, वि. स. खांडेकर आणि श्री. म. माटे प्रवेशद्वार अशी नावे देण्यात येतील. ग्रंथप्रदर्शन जिथे भरवले जात आहे, त्या परिसराला सावित्रीबाई फुले ग्रंथनगरी नाव देण्यात आले आहे. तर कवीकट्‌ट्याला अण्णाभाऊसाठे कवीकट्टा नाव देण्यात आले आहे. स्वागताध्यक्ष सतीश देसाई यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संमेलनाच्या समारोपाला अमिताभ बच्चन प्रमुख पाहुणे आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री अशोक चव्हाणही उपस्थित राहणार आहेत. मुंबईत अमिताभ यांच्या उपस्थित राहण्याला काँग्रेसजनांनी आक्षेप घेतला होता. पण साहित्य संमेलनात बच्चन आणि चव्हाण दोघेही उपस्थित राहतील, असा निर्वाळा संमेलनाचे कार्याध्यक्ष उल्हास पवार यांनी दिला आहे. संमेलनाचे उद्‌घाटन उद्या होते आहे. तर आज ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 25, 2010 10:52 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 25, 2010 10:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close