S M L

लोडशेडिंगमुक्तीचे स्वप्न

25 मार्चराज्याला लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी वीजनिर्मिती वाढवण्यावर अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी बजेटमध्ये भर दिला आहे. त्यासाठी काही नव्या वीजनिर्मिती प्रकल्पांची घोषणा त्यांनी केली आहे.त्याचबरोबर कृषीउत्पन्न वाढवण्यासाठी वेगवेगळ्या योजनाही तटकरे यांनी जाहीर केल्या आहेत.2012 पर्यंत लोडशेडिंगमुक्तीचे उद्दीष्ट2012 पर्यंत राज्य लोड शेडिंगमुक्त करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. त्यासाठी 2010-11 या आर्थिक वर्षात धुळे जिल्ह्यातील दोंडाईचामध्ये 1200 मेगॉवॅटचा औष्णिक वीज प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. भुसावळमध्ये एक हजार मेगावॅटचा, तर खापरखेडामध्ये 500 मेगावॅट वीज निर्मितीचे प्रकल्प उभारण्याची घोषणा तटकरे यांनी केली आहे. अन्नधान्याच्या वाढीसाठी विशेष योजनाराज्यातल्या अन्नधान्याच्या वाढीसाठी विशेष कार्यक्रम राबवण्याची घोषणा तटकरे यांनी केली. लहान शेतकर्‍यांना 50 हजारापर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याचा महत्त्वाचा निर्णय त्यांनी जाहीर केला. तसंच कृषी अवजारांसाठी 50 टक्के अनुदान मिळणार आहे. पाटबंधारे प्रकल्पासाठी 7 हजार 878 कोटी रुपये मिळणार आहेत. विदर्भात 593 कोटींचा समन्वयक कृषी विकास प्रकल्प राबवण्यात येणार आहे. आशियाई विकास बँकांच्या सहाय्यानं कृषी विकास योजना पुढील वर्षात राबवली जाणार आहे. कृषि संशोधनाला चालना देण्यासाठी रोह्याला कृषी कॉलेज सुरू करण्यात येणार आहे. तर कोकणात मत्स्य अभियांत्रिकी विद्यालयाची स्थापना करण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 25, 2010 12:17 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 25, 2010 12:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close