S M L

'निमंत्रण मिळाल्यानेच गेलो'

25 मार्चसी-लिंकच्या उद्घाटनासाठी अभिनेते अमिताभ बच्चन यांनी हजेरी लावल्याने काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीतून वादाचे पडसाद ऐकू येवू लागले आहेत. तर आता या वादावर बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवरून मत व्यक्त केले आहे. 'या कार्यक्रमाला सरकारकडून निमंत्रण मिळाल्यानेच मी या छोट्या पण शानदार सोहळ्याला उपस्थित राहिलो. वरळी-सी लिंकच्या वादानंतर मीडिया माझ्यामागे हात धुवून लागला आहे. मी जेथे जातो तेथे मीडिया माझ्या मागावर आहे. या सोहळ्यानंतर आता हा नवाच प्रकार सुरू झाला आहे'..अमिताभने हा सगळा खुलासा आपल्या ब्लॉगवर केला आहे. पण नेमके कोणत्या मंत्र्याकडून त्यांना निमंत्रण मिळआले होते, याबाबत त्यांनी नमूद केलेले नाही. संमेलनाला जाणार पुण्यात होणार्‍या साहित्य संमेलनाला मी जाणार आहे. तिथे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत व्यासपीठावर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे, असेही अमिताभ यांनी आज दिल्लीत स्पष्ट केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 25, 2010 01:49 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 25, 2010 01:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close