S M L

संमेलनात नवे पायंडे

नितीन चौधरी, पुणे26 मार्चसंमेलन म्हटले की वादविवाद आलेच. मग त्यांना कोणतेही कारण पुरते. पण 83 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दोन नवे पायंडे पाडण्यात आलेत. अध्यक्ष पदाची सूत्रे आणि संमेलनाचे उद्घाटन या दोन गोष्टींना नवे आयाम देण्यात आले आहे.संमेलन पुण्यात भरविण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद आणि पुण्यभूषण फाऊंडेशनने पुढाकार घेतला. संमेलनाच्या उद् घाटनापासून समारोपापर्यंतची कार्यक्रम प्रक्रिया ठरविताना अनेक वाद रंगले. पण हे संमेलन खरे गाजले ते प्रायोजकत्वा वरून. आणि अध्यक्षपदाची सूत्रे घेण्यावरून. पण साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी याबाबत ठाम भूमिका घेतली. आणि संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमापासूनच सूत्र नवीन अध्यक्षांकडे असतील असे जाहीर करून टाकले. संमेलनाच्या उद् घाटनाला सहसा साहित्य महामंडळाचे पदाधिकारी आणि राजकीय पुढारी दिसतात. पण या संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी दीप प्रज्वलनाचा मान एका पुस्तक विक्रेत्याला देण्यात आला. पुस्तक विक्रीतून मराठी साहित्याच्या प्रचारासाठी प्रथमच अशा बाहेरच्या माणसाला हा मान मिळाला. आषाढी वारीला दर्शनबारीत उभ्या असणार्‍या एखाद्या सामान्य वारकर्‍याला अशा प्रकारे महापूजेचे मान मिळतो.तीन दिवसांचे संमेलन संपल्यावर साहित्य विषयी फारशी चर्चा होताना दिसत नाही. यासाठी पण यानंतरच्या वर्षभराच्या काळात संमेलनाध्यक्षांना राज्यभर साहित्याच्या प्रचारासाठी फिरण्यासाठी पुण्यभूषण फाऊंडेशने 1 लाख रुपये देण्याचा नवा पायंडाही घातला आहे. पुढील काळातही साहित्य महामंडळ अशा नवीन उपक्रमांना प्रोत्साहन देईल, असे आता सर्वच साहित्यिक आणि साहित्यप्रेमींना वाटू लागले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 26, 2010 03:09 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 26, 2010 03:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close