S M L

मुख्यमंत्र्यांनी बच्चन यांना टाळले

27 मार्चअमिताभ बच्चन यांच्यासोबत मराठी साहित्य संमेलनाच्या व्यापीठावर बसणे अखेर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी टाळले आहे. पक्षश्रेष्ठींनी केलेल्या सूचनेमुळे मुख्यमंत्री अमिताभ यांच्यासोबत संमेलनात येणार नाहीत, असे खात्रीलायक वृत्त कालच 'आयबीएन-लोकमत'ने दिले होते. पण काँग्रेसच्या नेत्यांनी त्याचा इन्कार केला होता. अखेर आज मुख्यमंत्री पुण्यात साहित्य संमेलनात उपस्थित राहिले. 'माध्यम तंत्रज्ञान आणि मराठी भाषा' या परिसंवादाला त्यांनी हजेरीही लावली. पण यानंतर पत्रकारांनी विचारले असता, बच्चन प्रकरणी माझ्यावर कोणतेही बंधन नाही, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. नियोजित कार्यक्रमानुसार मुख्यमंत्री उद्या साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार होते. त्याचवेळी अमिताभ बच्चनही तिथे उपस्थित असणार होते. पण सी-लिंकप्रकरणानंतर अमिताभसोबत मंचावर येऊ नका, असा सल्ला हायकमांडने मुख्यमंत्र्यांना दिला होता. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी आज हजेरी लावली. पण समारोपाच्या कार्यक्रमाला हजेरी लावायची की नाही, याचा निर्णय घेण्यासाठी माझ्याकडे 24 तास आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले अमिताभ यांचा सन्मान करावादरम्यान, अभिनेते अमिताभ बच्चन हे सर्व भारतीयांच्या मनात वसलेले आहेत. त्यामुळे इथून पुढे त्यांचा अपमान होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे मत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे. आर. आर. पाटील उद्या साहित्य संमेलनाला हजेरी लावणार आहेत.ही तर अस्पृश्यतेची वागणूक अमिताभ बच्चन यांच्या सोबत न बसण्याचा मुख्यमंत्र्यांना सल्ला देऊन अमिताभ यांना काँग्रेसने अस्पृश्यतेची वागणूक दिली आहे, असा आरोप भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. काँग्रेसवर ऍट्रॉसिटी कायद्याप्रमाणे कारवाईबद्दल विचार व्हावा, असेही ते म्हणाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 27, 2010 01:02 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 27, 2010 01:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close