S M L

पुण्यात बालेवाडीमध्ये ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंची मांदियाळी

13 ऑक्टोबर, पुणे -तिसर्‍या युथ कॉमनवेल्थ स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचं प्रमुख आकर्षण होतं ते ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंची उपस्थिती. आणि त्याबरोबरच बॉलिवूडमधली विविध कलाकारांनी सादर केलेल्या कार्यक्रमांनीही सगळ्यांची मनं जिंकली.भारतीय क्रीडारसिक ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट पहात होते, त्या युथ कॉमनवेल्थ स्पर्धेला पुण्याच्या शिवछत्रपती क्रीडनगरीत दिमाखदार उद्घाटन सोहळ्याने सुरुवात झाली. स्पर्धेत सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात झाली महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणेशाच्या पूजनाने. प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमा मालिनी यांनी गणेशवंदना सादर केली. यंदाच्या युथ कॉमनवेल्थ स्पर्धेचा मॅस्कॉट आहे जिगर....आणि या जिगरचं वर्णन करणारं गीत बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांनी रचलं होतं. श्रेया घोषालनं हे गीत सादरकेलं. स्पर्धेच्या कार्यक्रमात खरी रंगत आणली ती अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या ठसकेबाज लावणीने उर्मिलाने सादर केलेल्या लावणीनं उपस्थित प्रेक्षकांची मनं जिंकली. यानंतर सेलिब्रेटींजच्या रंगारंग कार्यक्रमाने या शानदार सोहळ्याची सांगता झाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 13, 2008 04:02 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2008 04:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close