S M L

मुख्यमंत्री पद न मिळाल्याचं दु:ख नाही - छगन भुजबळ

15 ऑक्टोंबर, मुंबई' मी शक्ती प्रदर्शन करण्यासाठी आलेलो नाही. माझ्या भुजातील बळ हे व्यासपीठावर जमलेले मान्यवर नेते आणि समोर असलेला जनसमुदाय आहे. तोच खरा छगन भुजबळ आहे. माझ्या कारर्कीदीत मी कदाचित मुख्यमंत्री झालोअसतो पण 54 टक्के ओबीसींना आरक्षण देऊ शकलो नसतो. मुख्यमंत्री पद न मिळाल्याचं दु:ख वाटत नाही ', असं सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ शिवाजी पार्कवरील जनसभेला मार्गदर्शन करताना बोलत होते. छगन भुजबळांच्या एकसष्ठीनिमित्त शिवाजी पार्कवर जंगी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवाजी पार्कवर हजारो भुजबळ समर्थकांची गर्दी जमली होती. राज्यभरातून हजारो समर्थक उपस्थित होते. या सत्काराच्या कार्यक्रमात इतर पक्षांतील दिग्गज राजकारण्यांचाही सहभाग होता. सभेतील उपस्थित नेत्यांनी छगन भुजबळांच्या कार्याचं कौतुक केलं. ' तुम्ही दिल्लीला जावू नका. इथेच रहा. महाराष्ट्राला तुमची गरज आहे. राज्याला त्यांच्यासारख्या बेधडक नेत्यांची गरज आहे. स्वप्नाच्या आणि मनगटाच्या ताकदीवर भुजबळ यांनी सर्व काही कमावलं आहे. मात्र भुजबळ यांच्या व्यक्तिमत्वाला बांधकाम खातं शोभत नाही ', असं गोपीनाथ मुंडे यांनी भाषणात सांगितलं. छगन भुजबळांच्या एकष्टीनिमित्त आयोजित या जाहीर सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री विलासराव देशमुख, गृहमंत्री आर.आर.पाटील, नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, खासदार रामदास आठवले, समाजवादी पक्षाचे नेते अमरसिंग, भाजप नेते गोपीनाथ मुंडे हेही उपस्थित होते. एकष्टीनिमित्त शुभेच्छा देताना मुख्यमंत्री म्हणाले, ' आजचा कार्यक्रम हा भुजबळ यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा आहे'.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 15, 2008 04:56 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 15, 2008 04:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close