S M L

गायकवाड बंधू चर्चेत

15 एप्रिलआयपीएलच्या कोची टीमवरून सध्या वाद रंगला आहे. यात दररोज वेगवेगळ्या मुद्द्यांचा भर पडत आहे. पण यानिमित्ताने एक नव्याच कुटुंबाची आणि त्यांच्या श्रीमंतीची चर्चा सुरू झाली आहे. त्यांचे आडनाव आहे, गायकवाड. आणि हे मराठमोळे कुटुंब आहे, सोलापूरचे. गायकवाड कुटुंबीय सध्या सोलापुरात 'पुष्प' नावाच्या आलिशान बंगल्यात राहतात. सोलापूरमध्ये शैलेंद्र यांची पुष्प क्रिकेट अकॅडमीसुद्धा आहे. त्याच्या माध्यमातून ट्रेनिंग कॅम्प आणि वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना सचिन तेंडुलकर, झहिर खान, विनोद कांबळीसारखे अनेक नामवंत उपस्थित राहिले आहेत. शैलेंद्र गायकवाड यांचा कोची टीममध्ये चक्क 75 टक्के वाटा आहे.शैलेंद्र यांचे वडील इरिगेशन इंजीनिअर म्हणून निवृत्त झाले आहेत. मोठे भाऊ मुंबई आरटीओमध्ये रवी वरिष्ठ अधिकारी आहेत. गायकवाड पुष्प क्रिकेट अकॅडमीचे संचालक आहेत. तसेच ते महिंद्रा कंपनीची टेम्पो एजन्सी चालवतात. आरटीओत असलेले रवी गायकवाड विदेशातून मुंबईत येणार्‍या गाड्यांचा क्लिअरन्स करतात. यातूनच त्यांचा क्रिकेटपटूंशी संबंध आला. क्रिकेटपटूंना परदेशातील कामगिरीसाठी मिळालेल्या गाड्या त्यांनी क्लिअर करून दिल्या आहेत. यातून त्यांची क्रिकेटपटूंना गाड्या बक्षीस देणार्‍या कंपनीतील अधिकार्‍यांशी ओळख वाढली. याचाच त्यांनी स्वत:साठी पुरेपूर फायदा करुन घेतला. काही कंपन्यांशी संधान बांधून महागड्या गाड्या कमी कर भरुन मुंबईत आणायच्या आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे त्या मोठ्या किंमतीला विकायच्या असा व्यवहारही त्यांनी सुरू केला. त्यातूनच त्यांची संपत्ती वाढत गेल्याची चर्चा सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 15, 2010 11:40 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 15, 2010 11:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close