S M L

प्रिय अमुचा महाराष्ट्र देश हा!

1 मेबहु असोत सुंदर संपन्न की महाप्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा....तब्बल 50 वर्षांनंतर मुंबईने पुन्हा एकदा हे महाराष्ट्रगीत ऐकले...आणि महाराष्ट्राच्या अंगावर रोमांच उभे राहिले!तोच क्षण...तोच आवाज...संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापना दिनी गानसम्राज्ञी लता मंगेशकरांनी हे गीत गायले होते. आज त्यांनीच साथीदारांसह हे गीत पुन्हा एकदा गायले. निमित्त होते, 1 मे आणि महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवाचे. आणि स्थळ होते, मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. शिवसेनेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात स्वत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उपस्थित होते. लतादीदी आणि सारेगमपचे विजेते लिटील चॅम्प्स, तसेच सर्वांनी उभे राहून लतादीदींसोबत हे गीत गायले. मला पुन्हा हे गीत गायला मिळाले, हे मी माझे भाग्य समजते, असे भावपूर्ण उद्गार यावेळी लतादीदींनी काढले.

आईबीएन लोकमत | Updated On: May 1, 2010 05:20 PM IST

प्रिय अमुचा महाराष्ट्र देश हा!

1 मे

बहु असोत सुंदर संपन्न की महाप्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा....

तब्बल 50 वर्षांनंतर मुंबईने पुन्हा एकदा हे महाराष्ट्रगीत ऐकले...आणि महाराष्ट्राच्या अंगावर रोमांच उभे राहिले!

तोच क्षण...तोच आवाज...संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापना दिनी गानसम्राज्ञी लता मंगेशकरांनी हे गीत गायले होते. आज त्यांनीच साथीदारांसह हे गीत पुन्हा एकदा गायले. निमित्त होते, 1 मे आणि महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवाचे. आणि स्थळ होते, मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स.

शिवसेनेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात स्वत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उपस्थित होते.

लतादीदी आणि सारेगमपचे विजेते लिटील चॅम्प्स, तसेच सर्वांनी उभे राहून लतादीदींसोबत हे गीत गायले. मला पुन्हा हे गीत गायला मिळाले, हे मी माझे भाग्य समजते, असे भावपूर्ण उद्गार यावेळी लतादीदींनी काढले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 1, 2010 05:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close