S M L

कॉमनवेल्थ युथ गेम्सचा आज होणार समारोप

दिनांक 18 ऑक्टोबर, पुणे -मागचे सात दिवस पुण्यात सुरु असलेल्या कॉमनवेल्थ युथ गेम्सचा सांगता आज होणार आहे. समारोपाचा कार्यक्रमही उद्घाटनाइतका भव्य व्हावा यासाठी आयोजन समिती प्रयत्नशील आहे. यात देशाबरोबरच महाराष्ट्राच्या सांस्कृतीक परंपरेचं दर्शन जगाला होणार आहे. कॉमनवेल्थ युथ स्पर्धा भारतीय खेळाडूसाठी कमालीची यशस्वी ठरली. तब्बल 33 गोल्ड, 26 सिल्व्हर आणि 16 ब्राँझ अशा एकूण 75 मेडलसह भारताने मेडल टॅलीत पहिला क्रमांक पटकावला आहे. कॉमनवेल्थ युथ गेम्सच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताने अशी कामगिरी केली आहे. दुस-या क्रमांकावर राहिलेल्या ऑस्ट्रेलियाने 24 गोल्डसह एकूण 65 मेडल्स मिळवली. तर 41 मेडल्ससह इंग्लंडने तिसरा क्रमांक मिळवला. यात अठरा गोल्ड मेडलचा समावेश आहे यंदाच्या कॉमनवेल्थ युथ गेम्समध्ये 71 देशातल्या जवळ जवळ 1300 खेळाडूंनी भाग घेतला होता. उद्घाटना इतकाच समारोपाचाही कार्यक्रम भव्य व्हावा यासाठी आयोजन समिती प्रयत्नशील आहे. कार्यक्रमाची सुरुवात आर्मी बँड आणि डॉग शो यांच्या सादरीकरणानं होईल. समारोपाचाही कार्यक्रमात स्पर्धेनिमित्त काढलेल्या पोस्टल स्टॅम्पचं प्रकाशन करण्यात येईल. खेळाडंूच्या गौरव समारंभानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, राष्ट्रकुल क्रीडा संघटनेचे अध्यक्ष मायकेल फनेल यांच्या भाषणानं स्पर्धेचा समारोप होईल. आणि यानंतर होईल कुणाल गांजावाला, नृत्यदिग्दर्शक शामक दावर, शिल्पा शेट्टी, नेहा धुपिया, दिया मिर्झा आणि मलायका अरोरो यांच्या नृत्याचे कार्यक्रम सादर होतील.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 18, 2008 01:55 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 18, 2008 01:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close