S M L

ही लढाई देशासाठी...

6 मेमुंबईवर दहशतवादी हल्ला करून शेकडो बळी घेणार्‍या क्रूरकर्मा अजमल कसाबला आज फाशीची शिक्षा जाहीर झाली आणि सर्वत्र एकच जल्लोष झाला. विशेष म्हणजे सरकारच्या वतीने हा खटला लढणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. आपले कर्तव्य बजावण्यात निकम यांच्यापाठीशी उभे राहिले, ते त्यांचे कुटुंब. देशासाठी काम करणार्‍या उज्ज्वल निकम यांचा आम्हाला अभिमान वाटतो, अशी भावना व्यक्त करत या धडाडीच्या कुटुंबाने आज 'आयबीएन-लोकमत'शी संवाद साधला. 'आयबीएन-लोकमत'चे असोसिएट एडिटर अमोल परचुरे यांनी निकम कुटुंबीयांशी साधलेला हा संवाद...सुरुवातीला ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून निकम यांना प्रश्न विचारले. तुमच्या कार्याचा आम्हाला अभिमान वाटतो. तुम्हाला पद्मश्री का देऊ नये? तसेच कसाबला शिक्षा मिळाल्याने दहशतवादाला आळा बसेल का? असा प्रश्न बोराडे यांनी विचारला.त्यावर उज्ज्वल निकम म्हणाले, मला या खटल्याचे 12 भाग करता आले असते. पण त्यातून केवळ कसाबला शिक्षा झाली असती. आपण दहशतवादाच्या उगमस्थानापर्यंत जाऊ सकलो नसतो. म्हणून मी एकत्र आरोपपत्र दाखल केले. आणि आता त्यामुळे या खटल्यातील इतर आरोपींवरही खटला चालवण्यासाठी पाकिस्तानला भाग पाडले आहे. याशिवाय यातून अमेरिकेसारख्या पाकिस्तान आणि पाकिस्तानला मदत करणार्‍या अमेरिकेसारख्या देशालाही हा दहशतवाद एक दिवस तुमचाही चावा घेईल, असा इशारा दिला आहे. पद्मश्री पुरस्काराबद्दल बोलायचे म्हटले तर सामान्य माणसाचे पे्रम हाच माझ्यासाठी खरा पद्मश्री आहे. अमोल परचुरे - (उज्ज्वल निकम यांच्या आई विमलताई यांना) - तुम्ही मुलाला टीव्हीवर येऊ नका असे नेहमी सांगता, याचे काय कारण आहे? विमलताई निकम - उज्ज्वलने अनेक केसेस लढून अनेक गुन्हेगारांना शिक्षा दिली आहे. त्यामुळे काहीशी काळजी आणि भीती वाटते. पण उज्ज्वलचा जन्म हनुमान जयंतीच्या दिवशी झाला आहे. त्यावेळी म्हटल्याप्रमाणे उज्ज्वल खरोखर हनुमान पराक्रम करतो आहे. मला त्याचा अभिमान आहे. अमोल परचुरे - आई तुमची काळजी करते, तुम्हाला कधी भीती वाटली का? उज्ज्वल निकम - मला आत्तापर्यंत कधीही भीती वाटली नाही. दहशतवादी कसाब असो, अबू सालेम असो किंवा कोठेवाडीचे कुविख्यात दरोडेखोर...माणसाचे विचार स्पष्ट आणि स्वच्छ असतील तर असल्या आरोपींची तुमच्याबद्दल अपशब्द उच्चारण्याचीही हिंमत होत नाही. शिवी दिली म्हणून अबू सालेमने अनेकांचे खून पाडल्याचे मी त्याच्या केसहिस्ट्रीमध्ये वाचले होते. त्यामुळे मी मुद्दाम त्याला 'अभ्या' म्हणून हाक मारायचा...माझा आरोपीवर दबाव असतो. दुसर्‍याला आपल्याबद्दल भीती, आदर वाटावा, अशी माणसाची वागणूक असावी. अमोल परचुरे - ( उज्जवल निकम यांच्या पत्नी ज्योती यांना) - हा खटला संपल्यानंतर आपण आर्थर रोड जेलमधून सुटलो अशी प्रतिक्रिया निकम यांनी दिली. ते किती वेळ देतात कुटुंबासाठी?ज्योती निकम (उज्जवल निकम यांच्या पत्नी) - ते घरी पुरेसा वेळ देत नसल्याची आम्हाला अजिबातही खंत वाटत नाही. कारण त्यांच्यावरील जबाबदारी मोठी आहे. घरच्या गोष्टी शुल्लक असतात. त्यांनी देशासाठी प्रत्येक केसमध्ये यश मिळवावं, असंच आम्हाला वाटतं.अनिकेत निकम (निकम यांचा मुलगा) - मला बाबांबद्दल प्रचंड अभिमान आहे. हा खटला एकट्या कसाबच्या नव्हे तर दहशतवादाला पाठीशी घालणार्‍या पाकिस्तानच्या विरोधात आहे, असे ते मला नेहमी सांगत. या खटल्याच्या माध्यमातून पाकिस्तानचा तो चेहरा जगासमोर आणू , असा निश्चय व्यक्त करत. ते पहाटे 4 वाजता उठून अभ्यास करतात. पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचेही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष असते. आमचे आजोबाही बॅरिस्टर होते. त्यांनी विलायतेत जाऊन बॅरिस्टरकी मिळवली होती. आजोबा आणि वडिलांचाच वारसा आम्ही पुढे नेणार आहोत.उज्ज्वल निकम - अनिकेतने अमेरिकेत एलएलएम केले आहे. मी त्याला नेहमी दोन गोष्टी पाळायचा सल्ला दिलाय. पहिली म्हणजे वकील म्हणून कोर्टात प्रामाणिक राहायचे. आणि दुसरे म्हणजे अशिलांशी खरे बोलायचे. त्यांना खोटी आश्वासने द्यायची नाहीत. तरूण वकिलांनाही मी हेच सांगू इच्छितो. परदेशात वकिलीला प्रतिष्ठा आहे. पण दुदैर्वाने आपल्याकडे ती नाही. ही प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम तुमच्यासारख्या वकिलांवर आहे. कोणतीही नोकरी प्रामाणीकपणे करा असा मंत्र मी मुलाला आणि त्याच्या तरूण मित्रांना दिला आहे.विमलताई निकम (उज्ज्वल निकम यांच्या आई) - आमचे कुटुंब मोठे आहे. सगळे सुशिक्षित आहेत. मुलं सज्जन आहेत. माझा शब्द मोडत नाहीत. उज्जवल निकम - मी कुटुंबाकडे काहीसे दुर्लक्ष करतो. लढाई जिंकली पाहिजे हा एकच ध्यास ठेवतो. प्रत्येक खटला आम्ही युद्ध मानतो. यात सगळ्या कुटुंबाचा मला नेहमी आधार मिळाला आहे. आमचे कुटुंब आजही एकत्र आहे. या एकत्र कुटुंबाचेच मला जास्त फायदे झाले आहेत. विचारसरणी शुद्ध आणि स्वच्छ असली तर कोणत्याही कुटुंबाची प्रगती होतेच. अमोल परचुरे - खटला जिंकल्यावर लोकांनी निकम यांचे हारतुरे घालून जंगी स्वागत केले. तुम्ही कसे स्वागत करणार आहात?ज्योती निकम - (उज्जवल निकम यांच्या पत्नी) - जल्लोषात स्वागत करू. त्यांच्या आवडीचे पदार्थ करू. अमोल परचुरे - हा खटला संपला, पुढे काय करणार आहात?उज्ज्वल निकम - पहिल्यांदा या खटल्यातील संशयाचा फायदा घेऊन सुटलेले आरोपी फहीम अन्सारी आणि सबाउद्दीन यांच्या विरोधात अपिल करणार आहे. अबू सालेम आणि मुंबईतील काही खटले लवकर संपवणार. पुणे तसेच इतर जिल्ह्यांतही खटले आहेत. त्यामुळे बिझी असणारच आहे. मेंदू ही अष्टौप्रहर चालणारी चक्की आहे. या चक्कीत चांगल्या गोष्टी टाकल्या पाहिजेत. गुन्हेगारांशी आपण सतत लढले पाहिजे. समाजात एखादी वाईट घटना घडली तर, माझ्या घरी नाही ना मग मी कशाला जाऊ, ही भावना मनातून काढून टाकली पाहिजे. अमोल परचुरे - खटल्याचा निकाल जाहीर झाल्यावर तुम्ही 'येस यू आर गिल्टी' आणि 'डेथ पेनल्टी' हे दोन रिपोर्ट लिहिलेत. पुढच्या काळात या सगळ्या अनुभवाबद्दल पुस्तक लिहिण्याचा विचार आहे का?उज्जवल निकम - सगळेच खटले संवेदनशील असतात. पण यातील काही माहिती अत्यंत गोपनीय असतात. मी ते पत्नीलाही शेअर करत नाही. काही माहिती ही स्वत:पुरतीच ठेवणे योग्य असते. ती पुस्तकरुपाने ठेवणे योग्य नाही. पण भावी आयुष्यात तरुणांनी काय करावे, हे मी लिहिणार आहे. आम्हा कुटुंबीयांना तुम्ही अनपेक्षितरित्या एकत्र आणलेत, त्याबद्दल मी आभारी आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 6, 2010 03:41 PM IST

ही लढाई देशासाठी...

6 मे

मुंबईवर दहशतवादी हल्ला करून शेकडो बळी घेणार्‍या क्रूरकर्मा अजमल कसाबला आज फाशीची शिक्षा जाहीर झाली आणि सर्वत्र एकच जल्लोष झाला. विशेष म्हणजे सरकारच्या वतीने हा खटला लढणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला.

आपले कर्तव्य बजावण्यात निकम यांच्यापाठीशी उभे राहिले, ते त्यांचे कुटुंब. देशासाठी काम करणार्‍या उज्ज्वल निकम यांचा आम्हाला अभिमान वाटतो, अशी भावना व्यक्त करत या धडाडीच्या कुटुंबाने आज 'आयबीएन-लोकमत'शी संवाद साधला. 'आयबीएन-लोकमत'चे असोसिएट एडिटर अमोल परचुरे यांनी निकम कुटुंबीयांशी साधलेला हा संवाद...

सुरुवातीला ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून निकम यांना प्रश्न विचारले. तुमच्या कार्याचा आम्हाला अभिमान वाटतो. तुम्हाला पद्मश्री का देऊ नये? तसेच कसाबला शिक्षा मिळाल्याने दहशतवादाला आळा बसेल का? असा प्रश्न बोराडे यांनी विचारला.

त्यावर उज्ज्वल निकम म्हणाले, मला या खटल्याचे 12 भाग करता आले असते. पण त्यातून केवळ कसाबला शिक्षा झाली असती. आपण दहशतवादाच्या उगमस्थानापर्यंत जाऊ सकलो नसतो. म्हणून मी एकत्र आरोपपत्र दाखल केले. आणि आता त्यामुळे या खटल्यातील इतर आरोपींवरही खटला चालवण्यासाठी पाकिस्तानला भाग पाडले आहे. याशिवाय यातून अमेरिकेसारख्या पाकिस्तान आणि पाकिस्तानला मदत करणार्‍या अमेरिकेसारख्या देशालाही हा दहशतवाद एक दिवस तुमचाही चावा घेईल, असा इशारा दिला आहे.

पद्मश्री पुरस्काराबद्दल बोलायचे म्हटले तर सामान्य माणसाचे पे्रम हाच माझ्यासाठी खरा पद्मश्री आहे.

अमोल परचुरे - (उज्ज्वल निकम यांच्या आई विमलताई यांना) - तुम्ही मुलाला टीव्हीवर येऊ नका असे नेहमी सांगता, याचे काय कारण आहे?

विमलताई निकम - उज्ज्वलने अनेक केसेस लढून अनेक गुन्हेगारांना शिक्षा दिली आहे. त्यामुळे काहीशी काळजी आणि भीती वाटते. पण उज्ज्वलचा जन्म हनुमान जयंतीच्या दिवशी झाला आहे. त्यावेळी म्हटल्याप्रमाणे उज्ज्वल खरोखर हनुमान पराक्रम करतो आहे. मला त्याचा अभिमान आहे.

अमोल परचुरे - आई तुमची काळजी करते, तुम्हाला कधी भीती वाटली का?

उज्ज्वल निकम - मला आत्तापर्यंत कधीही भीती वाटली नाही. दहशतवादी कसाब असो, अबू सालेम असो किंवा कोठेवाडीचे कुविख्यात दरोडेखोर...माणसाचे विचार स्पष्ट आणि स्वच्छ असतील तर असल्या आरोपींची तुमच्याबद्दल अपशब्द उच्चारण्याचीही हिंमत होत नाही. शिवी दिली म्हणून अबू सालेमने अनेकांचे खून पाडल्याचे मी त्याच्या केसहिस्ट्रीमध्ये वाचले होते. त्यामुळे मी मुद्दाम त्याला 'अभ्या' म्हणून हाक मारायचा...माझा आरोपीवर दबाव असतो. दुसर्‍याला आपल्याबद्दल भीती, आदर वाटावा, अशी माणसाची वागणूक असावी.

अमोल परचुरे - ( उज्जवल निकम यांच्या पत्नी ज्योती यांना) - हा खटला संपल्यानंतर आपण आर्थर रोड जेलमधून सुटलो अशी प्रतिक्रिया निकम यांनी दिली. ते किती वेळ देतात कुटुंबासाठी?

ज्योती निकम (उज्जवल निकम यांच्या पत्नी) - ते घरी पुरेसा वेळ देत नसल्याची आम्हाला अजिबातही खंत वाटत नाही. कारण त्यांच्यावरील जबाबदारी मोठी आहे. घरच्या गोष्टी शुल्लक असतात. त्यांनी देशासाठी प्रत्येक केसमध्ये यश मिळवावं, असंच आम्हाला वाटतं.

अनिकेत निकम (निकम यांचा मुलगा) - मला बाबांबद्दल प्रचंड अभिमान आहे. हा खटला एकट्या कसाबच्या नव्हे तर दहशतवादाला पाठीशी घालणार्‍या पाकिस्तानच्या विरोधात आहे, असे ते मला नेहमी सांगत. या खटल्याच्या माध्यमातून पाकिस्तानचा तो चेहरा जगासमोर आणू , असा निश्चय व्यक्त करत. ते पहाटे 4 वाजता उठून अभ्यास करतात. पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचेही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष असते. आमचे आजोबाही बॅरिस्टर होते. त्यांनी विलायतेत जाऊन बॅरिस्टरकी मिळवली होती. आजोबा आणि वडिलांचाच वारसा आम्ही पुढे नेणार आहोत.

उज्ज्वल निकम - अनिकेतने अमेरिकेत एलएलएम केले आहे. मी त्याला नेहमी दोन गोष्टी पाळायचा सल्ला दिलाय. पहिली म्हणजे वकील म्हणून कोर्टात प्रामाणिक राहायचे. आणि दुसरे म्हणजे अशिलांशी खरे बोलायचे. त्यांना खोटी आश्वासने द्यायची नाहीत. तरूण वकिलांनाही मी हेच सांगू इच्छितो. परदेशात वकिलीला प्रतिष्ठा आहे. पण दुदैर्वाने आपल्याकडे ती नाही. ही प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम तुमच्यासारख्या वकिलांवर आहे. कोणतीही नोकरी प्रामाणीकपणे करा असा मंत्र मी मुलाला आणि त्याच्या तरूण मित्रांना दिला आहे.

विमलताई निकम (उज्ज्वल निकम यांच्या आई) - आमचे कुटुंब मोठे आहे. सगळे सुशिक्षित आहेत. मुलं सज्जन आहेत. माझा शब्द मोडत नाहीत.

उज्जवल निकम - मी कुटुंबाकडे काहीसे दुर्लक्ष करतो. लढाई जिंकली पाहिजे हा एकच ध्यास ठेवतो. प्रत्येक खटला आम्ही युद्ध मानतो. यात सगळ्या कुटुंबाचा मला नेहमी आधार मिळाला आहे. आमचे कुटुंब आजही एकत्र आहे. या एकत्र कुटुंबाचेच मला जास्त फायदे झाले आहेत. विचारसरणी शुद्ध आणि स्वच्छ असली तर कोणत्याही कुटुंबाची प्रगती होतेच.

अमोल परचुरे - खटला जिंकल्यावर लोकांनी निकम यांचे हारतुरे घालून जंगी स्वागत केले. तुम्ही कसे स्वागत करणार आहात?

ज्योती निकम - (उज्जवल निकम यांच्या पत्नी) - जल्लोषात स्वागत करू. त्यांच्या आवडीचे पदार्थ करू.

अमोल परचुरे - हा खटला संपला, पुढे काय करणार आहात?

उज्ज्वल निकम - पहिल्यांदा या खटल्यातील संशयाचा फायदा घेऊन सुटलेले आरोपी फहीम अन्सारी आणि सबाउद्दीन यांच्या विरोधात अपिल करणार आहे. अबू सालेम आणि मुंबईतील काही खटले लवकर संपवणार. पुणे तसेच इतर जिल्ह्यांतही खटले आहेत. त्यामुळे बिझी असणारच आहे. मेंदू ही अष्टौप्रहर चालणारी चक्की आहे. या चक्कीत चांगल्या गोष्टी टाकल्या पाहिजेत. गुन्हेगारांशी आपण सतत लढले पाहिजे. समाजात एखादी वाईट घटना घडली तर, माझ्या घरी नाही ना मग मी कशाला जाऊ, ही भावना मनातून काढून टाकली पाहिजे.

अमोल परचुरे - खटल्याचा निकाल जाहीर झाल्यावर तुम्ही 'येस यू आर गिल्टी' आणि 'डेथ पेनल्टी' हे दोन रिपोर्ट लिहिलेत. पुढच्या काळात या सगळ्या अनुभवाबद्दल पुस्तक लिहिण्याचा विचार आहे का?

उज्जवल निकम - सगळेच खटले संवेदनशील असतात. पण यातील काही माहिती अत्यंत गोपनीय असतात. मी ते पत्नीलाही शेअर करत नाही. काही माहिती ही स्वत:पुरतीच ठेवणे योग्य असते. ती पुस्तकरुपाने ठेवणे योग्य नाही. पण भावी आयुष्यात तरुणांनी काय करावे, हे मी लिहिणार आहे. आम्हा कुटुंबीयांना तुम्ही अनपेक्षितरित्या एकत्र आणलेत, त्याबद्दल मी आभारी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 6, 2010 03:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close