S M L

म्हाडाच्या घरांवर मंत्री टपले

11 मेमंत्र्यांना मिळालेल्या म्हाडाच्या घरांच्या वितरणाचा कार्यक्रम अखेर लांबणीवर टाकण्यात आला आहे. मीडियातून झालेल्या टीकेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत सर्वसामान्य माणसाचे घर घेण्याचे स्वप्न सध्या फक्त म्हाडाच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते. त्यासाठी अनेक कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागते. मुंबईत तुमच्या नावावर घर नसावे, अशी एक अट असतानाही काही मंत्री आणि राजकीय नेत्यांना मात्र म्हाडाची घरे मिळणार आहेत. म्हाडाच्या वर्सोवा येथील राजयोग सोसायटीत 203 आमदारांना घरे देण्यात येणार आहेत. या लाभार्थ्यांमध्ये मंत्रीदेखील आहेत. यात काँग्रेस नेते भाई जगताप, दुग्धविकास मंत्री नितीन राऊत, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे, ह्यांची मुंबईत घरे असूनही त्यांना म्हाडाची घरे मिळणार आहेत. या घरांच्या वितरणाचा कार्यक्रम उद्या होणार होता. खुद्द मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते हा कार्यक्रम होता. पण मीडियातून बरीच टीका झाल्यानं उद्याचा कार्यक्रम लांबणीवर टाकण्यात आला आहे. घरे प्राईम लोकेशनवर मुंबईतील वर्सोवा येथील प्राईम लोकेशनवर ही राजयोग सोसायटी आहे. 15 मजल्यांच्या चार बिल्डींग असलेल्या राजयोग सोसायटीत 693 स्क्वेअर फूट कारपेट एरिया तर 1 हजार स्क्वेअर फूट बिल्टअप एरिया असलेले टू बीएचके फ्लॅट्स आहेत. येथील एका फ्लॅटची किंमत आहे दीड कोटींपर्यंत...पण म्हाडातर्फे हेच फ्लॅट 48 लाखांपर्यंत विकले जात आहेत. त्यामुळेच स्वस्तात मिळणारी ही घरे राज्यातील तब्बल 203 आमदारांनी मिळवली आहेत. यातील काही आमदारांची मुंबईत घरे असूनही त्यांनी ही घरे मिळवली आहेत. यात म्हाडाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. मंत्री आघाडीवरयामध्ये आघाडीवर आहेत, काँग्रेसचे नेते भाई जगताप... मुंबईत त्यांचे दोन फ्लॅट्स आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनीच ही माहिती दिली आहे. त्यानंतर आहेत, राजेश टोपे. त्यांचेही मुंबईत घर असल्यांचे निवडणूक प्रतिज्ञापत्र सांगते. त्याचसोबत काँग्रेसचे नेते जनार्दन चांदुरकर यांच्या मुलाच्या, तर मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पत्नीच्या नावावर मंुबईत घर आहे. असे असूनही या मंत्री आणि आमदारांनी म्हाडाची घरे मिळवली आहेत.सर्वसामान्य लोकांना म्हाडाची घरे घेण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. पण मंत्री आणि आमदार यांच्यासाठी नियम वेगळे असावेत, असेच चित्र या राजयोग सोसायटीच्या घरे मिळवणार्‍यांच्या यादीवरून दिसते.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2010 01:28 PM IST

म्हाडाच्या घरांवर मंत्री टपले

11 मे

मंत्र्यांना मिळालेल्या म्हाडाच्या घरांच्या वितरणाचा कार्यक्रम अखेर लांबणीवर टाकण्यात आला आहे. मीडियातून झालेल्या टीकेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईत सर्वसामान्य माणसाचे घर घेण्याचे स्वप्न सध्या फक्त म्हाडाच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते. त्यासाठी अनेक कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागते.

मुंबईत तुमच्या नावावर घर नसावे, अशी एक अट असतानाही काही मंत्री आणि राजकीय नेत्यांना मात्र म्हाडाची घरे मिळणार आहेत.

म्हाडाच्या वर्सोवा येथील राजयोग सोसायटीत 203 आमदारांना घरे देण्यात येणार आहेत. या लाभार्थ्यांमध्ये मंत्रीदेखील आहेत.

यात काँग्रेस नेते भाई जगताप, दुग्धविकास मंत्री नितीन राऊत, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे, ह्यांची मुंबईत घरे असूनही त्यांना म्हाडाची घरे मिळणार आहेत.

या घरांच्या वितरणाचा कार्यक्रम उद्या होणार होता. खुद्द मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते हा कार्यक्रम होता. पण मीडियातून बरीच टीका झाल्यानं उद्याचा कार्यक्रम लांबणीवर टाकण्यात आला आहे.

घरे प्राईम लोकेशनवर

मुंबईतील वर्सोवा येथील प्राईम लोकेशनवर ही राजयोग सोसायटी आहे. 15 मजल्यांच्या चार बिल्डींग असलेल्या राजयोग सोसायटीत 693 स्क्वेअर फूट कारपेट एरिया तर 1 हजार स्क्वेअर फूट बिल्टअप एरिया असलेले टू बीएचके फ्लॅट्स आहेत.

येथील एका फ्लॅटची किंमत आहे दीड कोटींपर्यंत...पण म्हाडातर्फे हेच फ्लॅट 48 लाखांपर्यंत विकले जात आहेत. त्यामुळेच स्वस्तात मिळणारी ही घरे राज्यातील तब्बल 203 आमदारांनी मिळवली आहेत. यातील काही आमदारांची मुंबईत घरे असूनही त्यांनी ही घरे मिळवली आहेत. यात म्हाडाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे.

मंत्री आघाडीवर

यामध्ये आघाडीवर आहेत, काँग्रेसचे नेते भाई जगताप... मुंबईत त्यांचे दोन फ्लॅट्स आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनीच ही माहिती दिली आहे. त्यानंतर आहेत, राजेश टोपे. त्यांचेही मुंबईत घर असल्यांचे निवडणूक प्रतिज्ञापत्र सांगते. त्याचसोबत काँग्रेसचे नेते जनार्दन चांदुरकर यांच्या मुलाच्या, तर मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पत्नीच्या नावावर मंुबईत घर आहे. असे असूनही या मंत्री आणि आमदारांनी म्हाडाची घरे मिळवली आहेत.

सर्वसामान्य लोकांना म्हाडाची घरे घेण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. पण मंत्री आणि आमदार यांच्यासाठी नियम वेगळे असावेत, असेच चित्र या राजयोग सोसायटीच्या घरे मिळवणार्‍यांच्या यादीवरून दिसते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2010 01:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close