S M L

भारताचे आव्हान संपुष्टात

12 मे टी-20 वर्ल्डकपमधून अखेर भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. श्रीलंकेने भारताचा 5 विकेट राखून पराभव करत शानदार विजय मिळवला. सुपर एटमध्ये भारताला सलग तिसर्‍या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. टॉस जिंकून पहिली बॅटिंग करणार्‍या भारताने 5 विकेट गमावत 163 रन्स केले.सुरेश रैना आणि गौतम गंभीर वगळता भारताचे इतर बॅट्समन या महत्वाच्या मॅचमध्ये फ्लॉप ठरले. सुरेश रैनाने एकाकी झुंज देत 63 रन्स केले. त्याला गंभीरने 41 रन्स करत चांगली साथ दिली. पण मधल्या फळीने भारताचा पुन्हा एकदा घात केला. युवराज सिंग, युसुफ पठाण झटपट आऊट झाले. यामुळे चांगली सुरुवात करुनही भारताला मोठा स्कोअर उभारता आला नाही. याला उत्तर देताना श्रीलंकेची सुरुवातही खराब झाली. महेला जयवर्धने आणि सनथ जयसूर्या झटपट आऊट झाले. पण यानंतर भारतीय बॉलर्सना लंकेच्या बॅट्समनना रोखता आले नाही. तिलकरत्ने दिलशान आणि कॅप्टन कुमार संगकाराने सावध बॅटिंग करत स्कोअर वाढवला. तर एंजेलो मॅथ्यूज आणि कपुगेदराने शेवटच्या ओव्हर्समध्ये तुफान फटकेबाजी केली. विजयासाठी 1 बॉलमध्ये 3 रन्सची गरज असताना कपुगेदराने नेहराच्या बॉलवर सिक्स मारत लंकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.या पराभवासाठी कॅप्टन धोणीने आयपीएलचे कारण पुढे केले. पण भारताबरोबर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे खेळाडूही आयपीएल खेळले. त्यांच्यावर आयपीएलचा प्रतिकूल परिणाम का झाला नाही? याचे उत्तर धोणी देऊ शकेल का..पाहूया पराभवानंतर धोणीने पुढे केलेले बहाणे..बहाणा क्र. 1फास्ट बॉलर झहीर खानला आयपीएलमुळे थकवा जाणवत होता. सत्य- मग झहीर इतकेच क्रिकेट खेळलेल्या डर्क नॅनस किंवा शॉन टेटला थकवा जाणवत नव्हता का?बहाणा क्र. 2गौतम गंभीर आणि आशिष नेहरा यांना आयपीएल दरम्यान दुखापत झाली होती.सत्य - मग, त्यांना फिटनेस प्रमाणपत्र कसे मिळाले?बहाणा क्र. 3आयपीएल दरम्यान रात्रीच्या पाटर्‌यांमुळे खेळाडू दमले होते. सत्य - मग ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि श्रीलंकेचे खेळाडू या पार्टीला जात नव्हते का?बहाणा क्र. 4आयपीएलच्या व्यस्त कार्यक्रमामुळे खेळाडूंना तयारीला वेळ मिळाला नाहीसत्य - पाकिस्तान सोडले तर इतर सगळ्याच टीम भारताएवढेच क्रिकेट खेळल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 12, 2010 12:13 PM IST

भारताचे आव्हान संपुष्टात

12 मे

टी-20 वर्ल्डकपमधून अखेर भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. श्रीलंकेने भारताचा 5 विकेट राखून पराभव करत शानदार विजय मिळवला.

सुपर एटमध्ये भारताला सलग तिसर्‍या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. टॉस जिंकून पहिली बॅटिंग करणार्‍या भारताने 5 विकेट गमावत 163 रन्स केले.

सुरेश रैना आणि गौतम गंभीर वगळता भारताचे इतर बॅट्समन या महत्वाच्या मॅचमध्ये फ्लॉप ठरले. सुरेश रैनाने एकाकी झुंज देत 63 रन्स केले. त्याला गंभीरने 41 रन्स करत चांगली साथ दिली. पण मधल्या फळीने भारताचा पुन्हा एकदा घात केला.

युवराज सिंग, युसुफ पठाण झटपट आऊट झाले. यामुळे चांगली सुरुवात करुनही भारताला मोठा स्कोअर उभारता आला नाही. याला उत्तर देताना श्रीलंकेची सुरुवातही खराब झाली.

महेला जयवर्धने आणि सनथ जयसूर्या झटपट आऊट झाले. पण यानंतर भारतीय बॉलर्सना लंकेच्या बॅट्समनना रोखता आले नाही. तिलकरत्ने दिलशान आणि कॅप्टन कुमार संगकाराने सावध बॅटिंग करत स्कोअर वाढवला.

तर एंजेलो मॅथ्यूज आणि कपुगेदराने शेवटच्या ओव्हर्समध्ये तुफान फटकेबाजी केली. विजयासाठी 1 बॉलमध्ये 3 रन्सची गरज असताना कपुगेदराने नेहराच्या बॉलवर सिक्स मारत लंकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

या पराभवासाठी कॅप्टन धोणीने आयपीएलचे कारण पुढे केले. पण भारताबरोबर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे खेळाडूही आयपीएल खेळले. त्यांच्यावर आयपीएलचा प्रतिकूल परिणाम का झाला नाही? याचे उत्तर धोणी देऊ शकेल का..

पाहूया पराभवानंतर धोणीने पुढे केलेले बहाणे..

बहाणा क्र. 1फास्ट बॉलर झहीर खानला आयपीएलमुळे थकवा जाणवत होता. सत्य- मग झहीर इतकेच क्रिकेट खेळलेल्या डर्क नॅनस किंवा शॉन टेटला थकवा जाणवत नव्हता का?

बहाणा क्र. 2गौतम गंभीर आणि आशिष नेहरा यांना आयपीएल दरम्यान दुखापत झाली होती.सत्य - मग, त्यांना फिटनेस प्रमाणपत्र कसे मिळाले?

बहाणा क्र. 3आयपीएल दरम्यान रात्रीच्या पाटर्‌यांमुळे खेळाडू दमले होते. सत्य - मग ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि श्रीलंकेचे खेळाडू या पार्टीला जात नव्हते का?

बहाणा क्र. 4आयपीएलच्या व्यस्त कार्यक्रमामुळे खेळाडूंना तयारीला वेळ मिळाला नाहीसत्य - पाकिस्तान सोडले तर इतर सगळ्याच टीम भारताएवढेच क्रिकेट खेळल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 12, 2010 12:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close