S M L

नक्षलवादाला उद्योजकांचा पैसा

21 मेनक्षलवाद्यांना तेंदुपत्ता, बांबू आणि खाण उद्योगांमधून पैसा दिला जातो, असा गंभीर आरोप गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केला आहे. याच पैशातून नक्षली शस्त्रास्त्र खरेदी करतात, असेही ते म्हणाले. नक्षलवाद्यांनी देशाविरूध्द युध्द पुकारले असून त्याचा कठोरपणे मुकाबला करावा लागेल, असेही ते म्हणाले. मंगळवारी पोलीस कॅन्टीनचे उद्घाटन कार्यक्रमानंतर ते बोलत होते. नक्षलवाद्यांना आर्थिक रसद पुरवणार्‍या गडचिरोलीतील तेंदूचे अर्थकारण पाहूयात...तेंदू पत्ता...बिडीसाठी वापरले जाणारे झाडाचे पान...हाच तेंदूपत्ता नक्षलवाद्यांच्या कमाईचे साधन बनले आहे. या भागात जर कुठल्या ठेकेदाराला तेंदूचा ठेका मिळवायचा असेल, तर नक्षलवाद्यांना त्यांचा वाटा द्यावाच लागतो हे उघड सत्य आहे. एकेकाळी आदिवासींचे हित पाहणारे नक्षलवादी आज ठेकेदारांकडून सर्रास पैसे वसूल करत आहेत. आदिवासींना मात्र त्यांच्या मेहनतीचे फळ मिळत नाही. वन विभागाच्या वतीनं बांबू आणि तेंदू पत्याचा ठेका दिला जातो. यासाठी स्थानिक लोकांची मदत घेतली जाते. तेंदू पत्त्याचे अर्थकारण हे थोडेथिडके नाही, तर कोट्यवधींच्या घरात आहे. तेंदू पत्ते असणार्‍या या जिल्ह्यात 437 केंद्रांवर 7 लाख 7 हजार 900 बॅग उत्पादन होते. वर्षाला 55 कोटींच्या आसपासचा या व्यवसायात उलाढाल होते. तेंदू पत्त्याच्या भरवशावर अनेक ठेकेदार गब्बर झाले. ठेका मिळावा म्हणून कधी अधिकार्‍यांना तर कधी नक्षलवाद्यांना खूश ठेवून त्यांनी आपला व्यवसाय वाढवला. पण आज हीच डोकेदुखी ठरली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 21, 2010 02:00 PM IST

नक्षलवादाला उद्योजकांचा पैसा

21 मे

नक्षलवाद्यांना तेंदुपत्ता, बांबू आणि खाण उद्योगांमधून पैसा दिला जातो, असा गंभीर आरोप गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केला आहे.

याच पैशातून नक्षली शस्त्रास्त्र खरेदी करतात, असेही ते म्हणाले.

नक्षलवाद्यांनी देशाविरूध्द युध्द पुकारले असून त्याचा कठोरपणे मुकाबला करावा लागेल, असेही ते म्हणाले. मंगळवारी पोलीस कॅन्टीनचे उद्घाटन कार्यक्रमानंतर ते बोलत होते.

नक्षलवाद्यांना आर्थिक रसद पुरवणार्‍या गडचिरोलीतील तेंदूचे अर्थकारण पाहूयात...

तेंदू पत्ता...बिडीसाठी वापरले जाणारे झाडाचे पान...हाच तेंदूपत्ता नक्षलवाद्यांच्या कमाईचे साधन बनले आहे. या भागात जर कुठल्या ठेकेदाराला तेंदूचा ठेका मिळवायचा असेल, तर नक्षलवाद्यांना त्यांचा वाटा द्यावाच लागतो हे उघड सत्य आहे.

एकेकाळी आदिवासींचे हित पाहणारे नक्षलवादी आज ठेकेदारांकडून सर्रास पैसे वसूल करत आहेत. आदिवासींना मात्र त्यांच्या मेहनतीचे फळ मिळत नाही. वन विभागाच्या वतीनं बांबू आणि तेंदू पत्याचा ठेका दिला जातो. यासाठी स्थानिक लोकांची मदत घेतली जाते.

तेंदू पत्त्याचे अर्थकारण हे थोडेथिडके नाही, तर कोट्यवधींच्या घरात आहे. तेंदू पत्ते असणार्‍या या जिल्ह्यात 437 केंद्रांवर 7 लाख 7 हजार 900 बॅग उत्पादन होते. वर्षाला 55 कोटींच्या आसपासचा या व्यवसायात उलाढाल होते.

तेंदू पत्त्याच्या भरवशावर अनेक ठेकेदार गब्बर झाले. ठेका मिळावा म्हणून कधी अधिकार्‍यांना तर कधी नक्षलवाद्यांना खूश ठेवून त्यांनी आपला व्यवसाय वाढवला. पण आज हीच डोकेदुखी ठरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2010 02:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close