S M L

'अब्दुल समदचा पुणे स्फोटाशी संबंध नाही'

28 मेअब्दुल मसद समदच्या अटकेचा पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाशी काहीही संबंध नसल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक ए. एन. रॉय यांनी म्हटले आहे. आज पुणे गुन्हे अन्वेषण विभागातर्फे रॉय यांना निरोप देण्यात आला. हा निरोप समारंभ संपल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना रॉय यांनी ही बाब स्पष्ट केली. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात नक्षलवाद नियंत्रणात असल्याचेही ते यावेळी म्हणाले. पोलीस दलातील तब्बल 38 वर्षाच्या सेवेनंतर येत्या 31 मे रोजी रॉय सेवानिवृत्त होत आहेत. या कार्यक्रमात रॉय सपत्नीक उपस्थित होते. या वेळी रॉय यांच्या पत्नी मोना रॉय यांनी पोलीस दलावर आधारीत असलेल्या दोन पुस्तकांचे प्रकाशन केले.

आईबीएन लोकमत | Updated On: May 28, 2010 11:22 AM IST

'अब्दुल समदचा पुणे स्फोटाशी संबंध नाही'

28 मे

अब्दुल मसद समदच्या अटकेचा पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाशी काहीही संबंध नसल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक ए. एन. रॉय यांनी म्हटले आहे.

आज पुणे गुन्हे अन्वेषण विभागातर्फे रॉय यांना निरोप देण्यात आला. हा निरोप समारंभ संपल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना रॉय यांनी ही बाब स्पष्ट केली.

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात नक्षलवाद नियंत्रणात असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

पोलीस दलातील तब्बल 38 वर्षाच्या सेवेनंतर येत्या 31 मे रोजी रॉय सेवानिवृत्त होत आहेत. या कार्यक्रमात रॉय सपत्नीक उपस्थित होते.

या वेळी रॉय यांच्या पत्नी मोना रॉय यांनी पोलीस दलावर आधारीत असलेल्या दोन पुस्तकांचे प्रकाशन केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 28, 2010 11:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close