S M L

ते संपादकीय बाळासाहेबांचे नव्हे...

5 जूनऔरंगाबामध्ये भाजप आणि शिवसेनेत तणावाचे वातावरण कायम आहे. त्यातच 'मित्रवर्याचा निकाह' या नावाने 'सामना'त लिहिलेल्या संपादकीयामुळे भाजप चांगलाच दुखावला गेला आहे. आता हे संपादकीय संपादकाने नव्हे तर 'सामना'तील कर्मचार्‍यांनी लिहिल्यासारखे वाटते, असे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी म्हटले आहे. भाजपच्या ऑफीसवरील आणि नगरसेवकाच्या गाडीवरील हल्ला भ्याड असल्याची टीकाही भाजपने केली आहे. मुंडे आणि खैरे एकत्रशिवसेना-भारतीय जनता पक्षात तणावाचे वातावरण आहे. असे असले तरी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे आणि शिवसेनेचे उपनेते खासदार चंद्रकांत खैरे आज औरंगाबादमध्ये एका साखरपुड्याच्या कार्यक्रमात एकत्र मिरवताना आणि दिलखुलास चर्चा करताना दिसले. यावेळी मुंडे यांनी शिवसेना-भाजपमधील तणावाविषयी तूर्तास भाष्य नको, असे म्हटले. दोन्ही पक्षांतील बैठकीनंतरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 5, 2010 04:27 PM IST

ते संपादकीय बाळासाहेबांचे नव्हे...

5 जून

औरंगाबामध्ये भाजप आणि शिवसेनेत तणावाचे वातावरण कायम आहे. त्यातच 'मित्रवर्याचा निकाह' या नावाने 'सामना'त लिहिलेल्या संपादकीयामुळे भाजप चांगलाच दुखावला गेला आहे.

आता हे संपादकीय संपादकाने नव्हे तर 'सामना'तील कर्मचार्‍यांनी लिहिल्यासारखे वाटते, असे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी म्हटले आहे. भाजपच्या ऑफीसवरील आणि नगरसेवकाच्या गाडीवरील हल्ला भ्याड असल्याची टीकाही भाजपने केली आहे.

मुंडे आणि खैरे एकत्र

शिवसेना-भारतीय जनता पक्षात तणावाचे वातावरण आहे. असे असले तरी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे आणि शिवसेनेचे उपनेते खासदार चंद्रकांत खैरे आज औरंगाबादमध्ये एका साखरपुड्याच्या कार्यक्रमात एकत्र मिरवताना आणि दिलखुलास चर्चा करताना दिसले.

यावेळी मुंडे यांनी शिवसेना-भाजपमधील तणावाविषयी तूर्तास भाष्य नको, असे म्हटले. दोन्ही पक्षांतील बैठकीनंतरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2010 04:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close