S M L

सचिन होणार एअर फोर्सचा ग्रुप कॅप्टन

23 जूनसचिन तेंडुलकर हा भारतीय क्रिकेटमधील आयकॉन आहे. आणि सगळ्यांनाच त्याच्या क्रिकेटमधील कामगिरीबद्दल अभिमान आहे. भारतीय हवाई दलाने सचिनच्या कर्तृत्वाचा अनोखा सन्मान करायचे ठरवले आहे. ग्रुप कॅप्टन हे पद त्याला बहाल करण्यात येणार आहे. हवाई दलाच्या शिफारशीवर केंद्र सरकारनेही अनुकूल मत नोंदवल्याने आता सचिन थोड्याच दिवसात कॅप्टन सचिन तेंडुलकर होणार आहे. सचिनचा क्रिकेट कार्यक्रम पाहून पद बहाल करण्याचा कार्यक्रम ठरवण्यात येणार आहे. सचिनला सुखोई -30 एअरक्राफ्टमध्ये बसण्याची इच्छा आहे. आणि तशी विनंतीही त्याने हवाई दलाला केली. सचिनची ही विनंतीही मान्य होण्याची शक्यता आहे. आणि तसे झाले तर पुण्याजवळ लोहगाव इथे सचिनसाठी या एअरक्राफ्टची सफर आयोजित करण्यात येणार आहे. यापूर्वी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम या दोघांनाच या एअरक्राफ्टची सफर करता आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 23, 2010 02:48 PM IST

सचिन होणार एअर फोर्सचा ग्रुप कॅप्टन

23 जून

सचिन तेंडुलकर हा भारतीय क्रिकेटमधील आयकॉन आहे. आणि सगळ्यांनाच त्याच्या क्रिकेटमधील कामगिरीबद्दल अभिमान आहे. भारतीय हवाई दलाने सचिनच्या कर्तृत्वाचा अनोखा सन्मान करायचे ठरवले आहे. ग्रुप कॅप्टन हे पद त्याला बहाल करण्यात येणार आहे.

हवाई दलाच्या शिफारशीवर केंद्र सरकारनेही अनुकूल मत नोंदवल्याने आता सचिन थोड्याच दिवसात कॅप्टन सचिन तेंडुलकर होणार आहे. सचिनचा क्रिकेट कार्यक्रम पाहून पद बहाल करण्याचा कार्यक्रम ठरवण्यात येणार आहे.

सचिनला सुखोई -30 एअरक्राफ्टमध्ये बसण्याची इच्छा आहे. आणि तशी विनंतीही त्याने हवाई दलाला केली. सचिनची ही विनंतीही मान्य होण्याची शक्यता आहे. आणि तसे झाले तर पुण्याजवळ लोहगाव इथे सचिनसाठी या एअरक्राफ्टची सफर आयोजित करण्यात येणार आहे.

यापूर्वी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम या दोघांनाच या एअरक्राफ्टची सफर करता आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 23, 2010 02:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close