S M L

सडणार्‍या गव्हाकडे पवारांची डोळेझाक

23 जुलै, दिल्ली'गव्हाचं नुकसान होतच असतं. आताच नव्हे तर अनेक वर्षांपासून असं नुकसान होतंय, त्यात विशेष काही नाही. आमच्याकडे अन्नधान्य ठेवण्यासाठी अपुरी गोदामं आहेत.' असं कृषीमंत्री शरद पवार यांनी म्हटलंय. दिल्लीत एका कार्यक्रमात ते बोलत होते.काही दिवसांपूर्वी हरियाणातील सिरसा इथं तब्बल 2 लाख क्विंटल गहू पाण्यामध्ये सडला. तर गोंदिया फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियातील अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे उघड्यावर पडलेला जवळपास 4 हजार मेट्रिक टन गहू सडला आहे. सडणार्‍या गव्हावर प्रतिक्रिया देताना पवार यांनी लवकरच नवी गोदामं बांधण्यात येतील अशी ग्वाही दिली.अन्नधान्याच्या नुकसानाची आकडेवारी168 लाख मेट्रिक टन धान्याची उघड्यावर साठवणउघड्यावर पडलेल्या धान्याची किंमत 28 हजार कोटी रु.21 कोटी लोकांच्या वर्षभर जेवणाची सोयएकूण उत्पादनापैकी 30 टक्के धान्य उघड्यावरपंजाब, हरियाणा आणि ईशान्य भारतात धान्य उघड्यावर ठेवण्याचं प्रमाण जास्त एकूण 578 लाख मेट्रिक टन अन्नधान्यापैकी 168 लाख मेट्रिक टन धान्य उघड्यावर साठवलं जातं

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 23, 2010 10:37 AM IST

सडणार्‍या गव्हाकडे पवारांची डोळेझाक

23 जुलै, दिल्ली

'गव्हाचं नुकसान होतच असतं. आताच नव्हे तर अनेक वर्षांपासून असं नुकसान होतंय, त्यात विशेष काही नाही. आमच्याकडे अन्नधान्य ठेवण्यासाठी अपुरी गोदामं आहेत.' असं कृषीमंत्री शरद पवार यांनी म्हटलंय. दिल्लीत एका कार्यक्रमात ते बोलत होते.

काही दिवसांपूर्वी हरियाणातील सिरसा इथं तब्बल 2 लाख क्विंटल गहू पाण्यामध्ये सडला. तर गोंदिया फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियातील अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे उघड्यावर पडलेला जवळपास 4 हजार मेट्रिक टन गहू सडला आहे. सडणार्‍या गव्हावर प्रतिक्रिया देताना पवार यांनी लवकरच नवी गोदामं बांधण्यात येतील अशी ग्वाही दिली.

अन्नधान्याच्या नुकसानाची आकडेवारी

168 लाख मेट्रिक टन धान्याची उघड्यावर साठवण

उघड्यावर पडलेल्या धान्याची किंमत 28 हजार कोटी रु.

21 कोटी लोकांच्या वर्षभर जेवणाची सोय

एकूण उत्पादनापैकी 30 टक्के धान्य उघड्यावर

पंजाब, हरियाणा आणि ईशान्य भारतात धान्य उघड्यावर ठेवण्याचं प्रमाण जास्त

एकूण 578 लाख मेट्रिक टन अन्नधान्यापैकी 168 लाख मेट्रिक टन धान्य उघड्यावर साठवलं जातं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 23, 2010 10:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close