S M L

ऑगस्ट क्रांती दिन साजरा

09 ऑगस्टसोमवारी ऑगस्ट क्रांती या दिवसानिमित्त मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानात विविध पक्षांनी चले जाव चळवळीच्या स्मृती जागवल्या. कॉग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीने स्वतंत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भूजबळ यांनी महात्मा गांधीजींच्या स्मृतीस्तंभाला पुष्प वाहून आदरांजली वाहिली. काँग्रेस सेवा दल आणि राष्ट्रवादी सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी ऑगस्ट क्रांती मैदान आज फुलून गेला होता. तर औरंगाबाद शहरात शाळकरी विद्यार्थी आणि खुल्या वर्गासाठी सदभावना रॅलीचं आयोजन केलं होतं.या रॅलीत हजारो शाळकरी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शहरातील निरालाबाजार इथून सुरु झालेली ही रॅली पैठणगेट, गुलमंडी, औरंगपुरा भागात काढण्यात आली. रॅलीचा समारोप जिल्हा परिषदेच्या मैदानावर करण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 9, 2010 04:38 PM IST

ऑगस्ट क्रांती दिन साजरा

09 ऑगस्ट

सोमवारी ऑगस्ट क्रांती या दिवसानिमित्त मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानात विविध पक्षांनी चले जाव चळवळीच्या स्मृती जागवल्या. कॉग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीने स्वतंत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भूजबळ यांनी महात्मा गांधीजींच्या स्मृतीस्तंभाला पुष्प वाहून आदरांजली वाहिली. काँग्रेस सेवा दल आणि राष्ट्रवादी सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी ऑगस्ट क्रांती मैदान आज फुलून गेला होता. तर औरंगाबाद शहरात शाळकरी विद्यार्थी आणि खुल्या वर्गासाठी सदभावना रॅलीचं आयोजन केलं होतं.

या रॅलीत हजारो शाळकरी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शहरातील निरालाबाजार इथून सुरु झालेली ही रॅली पैठणगेट, गुलमंडी, औरंगपुरा भागात काढण्यात आली. रॅलीचा समारोप जिल्हा परिषदेच्या मैदानावर करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 9, 2010 04:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close