S M L

सांगलीतील संमेलनाचाही हिशोब बाकी

27 ऑगस्टएकीकडे पुण्याच्या साहित्य संमेलनाचा घोळ गाजत असतानाच सांगलीत झालेल्या 81 व्या साहित्य संमेलनाचा हिशोब अद्याप दिला नसल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. सांगलीत जानेवारी 2008 मध्ये 81 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवण्यात आले होते. या साहित्य संमेलनासाठी कोट्यवधी रूपयांचा निधीही गोळा करण्यात आला होता. तसेच संमेलन भव्य व्हावे यासाठी खर्चही करण्यात आला होता.मात्र दोन वर्षे लोटली तरी यासंबंधीचा हिशोब उपलब्ध होत नाही, असा आरोप ग्राहक पंचायतीने केला आहे.गिरीजा कीर यांचा आरोप84 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घ्यावी म्हणून दबाव आल्याचा आरोप गिरीजा कीर यांनी केला आहे. कथाकार आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार गिरीजा कीर यांनी नागपूरच्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमानंतर हा आरोप केला आहे

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 27, 2010 12:32 PM IST

सांगलीतील संमेलनाचाही हिशोब बाकी

27 ऑगस्ट

एकीकडे पुण्याच्या साहित्य संमेलनाचा घोळ गाजत असतानाच सांगलीत झालेल्या 81 व्या साहित्य संमेलनाचा हिशोब अद्याप दिला नसल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. सांगलीत जानेवारी 2008 मध्ये 81 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवण्यात आले होते. या साहित्य संमेलनासाठी कोट्यवधी रूपयांचा निधीही गोळा करण्यात आला होता. तसेच संमेलन भव्य व्हावे यासाठी खर्चही करण्यात आला होता.मात्र दोन वर्षे लोटली तरी यासंबंधीचा हिशोब उपलब्ध होत नाही, असा आरोप ग्राहक पंचायतीने केला आहे.

गिरीजा कीर यांचा आरोप

84 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घ्यावी म्हणून दबाव आल्याचा आरोप गिरीजा कीर यांनी केला आहे. कथाकार आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार गिरीजा कीर यांनी नागपूरच्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमानंतर हा आरोप केला आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 27, 2010 12:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close