S M L

पंडीत आप्पासाहेब देशपांडे यांचे निधन

प्रताप नाईक , कोल्हापूर3 सप्टेंबरगंधर्व गायकी, जयपूर, आग्रा, किराणा गायकीसह चार घराण्याच्या गायकीवर प्रभुत्व असणारे नूतन गंधर्व पंडीत विनायकराव देशपांडे उर्फ आप्पासाहेब देशपांडे यांचे आज कोल्हापुरात निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. गायकीलाच आपले जीवन मानणार्‍या नूतन गंधर्वांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या शास्रीय आणि नाट्यसंगीतात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.संकेश्वरच्या शंकराचार्यांनी एका कार्यक्रमात त्यांचे गाणे ऐकून त्यांना नूतन गंधर्व हा किताब बहाल केला. अगदी 80 - 82 व्या वर्षीही अप्पासाहेब गायनात सक्रिय होते.ग्रामोफोन ऐकून विविध गायकांची गीते हुबेहूब गाणे ही त्यांची आवड. गानसम्राट अल्लादिया खाँसाहेब यांचे सुपुत्र भुर्जीखाँसाहेब यांच्याकडे गंडा बंधन करुन त्यांनी शागिर्दी पत्करली. बालगंधर्व यांचा आदर्श समोर ठेवून त्यांनी नाट्यसंगीताचा अभ्यास केला. महाराष्ट्र आणि देशाबाहेरील बरीच संगीत संमेलन त्यांनी गाजवली.कोणत्याही बिदागीची अपेक्षा न करता नुतन गंधर्व केवळ गाण्यासाठी जगले. अखेरच्या श्वासापर्यंत गायनात रमलेले नूतन गंधर्व यांनी जाता जाता गायनाची वैभवशाली परंपरा आणखी समृद्ध केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 3, 2010 02:56 PM IST

पंडीत आप्पासाहेब देशपांडे यांचे निधन

प्रताप नाईक , कोल्हापूर

3 सप्टेंबर

गंधर्व गायकी, जयपूर, आग्रा, किराणा गायकीसह चार घराण्याच्या गायकीवर प्रभुत्व असणारे नूतन गंधर्व पंडीत विनायकराव देशपांडे उर्फ आप्पासाहेब देशपांडे यांचे आज कोल्हापुरात निधन झाले. ते 86 वर्षांचे होते.

गायकीलाच आपले जीवन मानणार्‍या नूतन गंधर्वांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या शास्रीय आणि नाट्यसंगीतात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

संकेश्वरच्या शंकराचार्यांनी एका कार्यक्रमात त्यांचे गाणे ऐकून त्यांना नूतन गंधर्व हा किताब बहाल केला. अगदी 80 - 82 व्या वर्षीही अप्पासाहेब गायनात सक्रिय होते.

ग्रामोफोन ऐकून विविध गायकांची गीते हुबेहूब गाणे ही त्यांची आवड. गानसम्राट अल्लादिया खाँसाहेब यांचे सुपुत्र भुर्जीखाँसाहेब यांच्याकडे गंडा बंधन करुन त्यांनी शागिर्दी पत्करली.

बालगंधर्व यांचा आदर्श समोर ठेवून त्यांनी नाट्यसंगीताचा अभ्यास केला. महाराष्ट्र आणि देशाबाहेरील बरीच संगीत संमेलन त्यांनी गाजवली.

कोणत्याही बिदागीची अपेक्षा न करता नुतन गंधर्व केवळ गाण्यासाठी जगले. अखेरच्या श्वासापर्यंत गायनात रमलेले नूतन गंधर्व यांनी जाता जाता गायनाची वैभवशाली परंपरा आणखी समृद्ध केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 3, 2010 02:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close