S M L

राहुलनी जिंकली विद्यार्थ्यांची मने

7 सप्टेंबरराज्यात आज दिवसभर चर्चा होती ती काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्या दौर्‍याची. पश्चिम बंगालमध्ये काल राजकीय सभा घेतल्यानंतर राहुलनी आज महाराष्ट्रात मात्र राजकीय कार्यक्रमांना फाटा दिला. आणि विद्यार्थी, तरुणांशी दिलखुलास गप्पा मारल्या.विदर्भ मराठवाड्यात दौराराहुल गांधींनी आज विदर्भ, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला. त्यांच्या दौर्‍याची सुरुवात झाली अकोल्यापासून. अकोल्यात तरुणांशी गप्पा मारल्यानंतर ते औरंगाबादमध्ये आले.राहुल गांधींच्या सुरक्षेचा फटका बसल्याने या ठिकाणी तरुण मात्र नाराज झाले. त्यानंतर पुण्यात आलेल्या राहुलनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.औरंगाबादमध्ये गर्दीऔरंगाबादमध्ये राहुलना बघण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती. पण त्याआधी राहूल गांधीच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेचा फटका विद्यार्थ्यांना बसला. अकोल्यात विद्यार्थ्यांना चप्पल काढण्याची सक्ती पोलिसांनी केली. तर औरंगाबादमध्ये मुलींना दागिने काढण्यासाठी सक्ती करण्यात आली. मुलांचे बेल्टही पोलिसांनी काढून घेतले. या सगळ्या प्रकाराबद्दल विद्यार्थ्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली.राजकीय नेते बाजूलाराहुलनी या दौर्‍यात राजकीय नेत्यांना बाजूला ठेवले. कॉलेजचे विद्यार्थी, विद्यार्थी, आणि तरुणांना लक्षात घेऊन राहुलनी आपला दौरा आखला होता. त्यामुळे या दौर्‍यात तिनही ठिकाणी त्यांनी विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.भारत आणि इंडिया अशी दरी देशात निर्माण झाली आहे. ही दरी मिटवण्याचे आव्हान तरुणांनाच पेलावे लागणार असल्याचे राहुल म्हणाले. झोपडपट्टीत राहणार्‍या तरुणांमध्ये खरी ऊर्जा लपलेली आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणायला हवे, असे ते म्हणाले. राजकारण हेच देशातील सर्व सुधारणांचे मूळ आहे. देशाचा विकास आणि भवितव्य राजकारणच ठरवते, असे सांगत राहुलनी तरुणांना राजकारणात येण्याचे आवाहन केले. देशात लोकशाही आहे. पण पक्षात मात्र लोकशाही चालत नाही. आणि याला कोणताच पक्ष अपवाद नसल्याचे राहुल यांनी स्पष्ट केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 7, 2010 03:49 PM IST

राहुलनी जिंकली विद्यार्थ्यांची मने

7 सप्टेंबर

राज्यात आज दिवसभर चर्चा होती ती काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्या दौर्‍याची. पश्चिम बंगालमध्ये काल राजकीय सभा घेतल्यानंतर राहुलनी आज महाराष्ट्रात मात्र राजकीय कार्यक्रमांना फाटा दिला. आणि विद्यार्थी, तरुणांशी दिलखुलास गप्पा मारल्या.

विदर्भ मराठवाड्यात दौरा

राहुल गांधींनी आज विदर्भ, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला. त्यांच्या दौर्‍याची सुरुवात झाली अकोल्यापासून. अकोल्यात तरुणांशी गप्पा मारल्यानंतर ते औरंगाबादमध्ये आले.

राहुल गांधींच्या सुरक्षेचा फटका बसल्याने या ठिकाणी तरुण मात्र नाराज झाले. त्यानंतर पुण्यात आलेल्या राहुलनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

औरंगाबादमध्ये गर्दी

औरंगाबादमध्ये राहुलना बघण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती. पण त्याआधी राहूल गांधीच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेचा फटका विद्यार्थ्यांना बसला.

अकोल्यात विद्यार्थ्यांना चप्पल काढण्याची सक्ती पोलिसांनी केली. तर औरंगाबादमध्ये मुलींना दागिने काढण्यासाठी सक्ती करण्यात आली. मुलांचे बेल्टही पोलिसांनी काढून घेतले. या सगळ्या प्रकाराबद्दल विद्यार्थ्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली.

राजकीय नेते बाजूला

राहुलनी या दौर्‍यात राजकीय नेत्यांना बाजूला ठेवले. कॉलेजचे विद्यार्थी, विद्यार्थी, आणि तरुणांना लक्षात घेऊन राहुलनी आपला दौरा आखला होता. त्यामुळे या दौर्‍यात तिनही ठिकाणी त्यांनी विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

भारत आणि इंडिया अशी दरी देशात निर्माण झाली आहे. ही दरी मिटवण्याचे आव्हान तरुणांनाच पेलावे लागणार असल्याचे राहुल म्हणाले. झोपडपट्टीत राहणार्‍या तरुणांमध्ये खरी ऊर्जा लपलेली आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणायला हवे, असे ते म्हणाले.

राजकारण हेच देशातील सर्व सुधारणांचे मूळ आहे. देशाचा विकास आणि भवितव्य राजकारणच ठरवते, असे सांगत राहुलनी तरुणांना राजकारणात येण्याचे आवाहन केले. देशात लोकशाही आहे. पण पक्षात मात्र लोकशाही चालत नाही. आणि याला कोणताच पक्ष अपवाद नसल्याचे राहुल यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 7, 2010 03:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close