S M L

इंडियन स्पोर्ट लिजंडस्

देशाचा अभिमान..उल्लेखनीय कर्तृत्व..त्यांचा आदर्श पिढ्यांना प्रेरणा देणारा..स्वप्न वास्तवात उतरणारे..जिगरबाज खेळाडू..! देशाचे नाव उज्ज्वल करणार्‍या या खेळाडूंचा गौरव नेटवर्क 18 करणार आहे. कॉमनवेल्थ गेम्सच्या निमित्ताने राजधानी सज्ज होत आहे. या पार्श्वभूमीवर या खेळाडूंच्या सन्मानासाठी 'एअरटेल प्रस्तुत इंडियन स्पोर्टस्‌ लिजंडस्' या विशेष उपक्रमाचे 24 सप्टेंबर रोजी दिल्लीत आयोजन करण्यात आले आहे.नेटवर्क 18च्या सीएनएन-आयबीएन, आयबीएन-7, आयबीएन-लोकमत, सीएनबीसी-टीव्ही 18, सीएनबीसी-आवाज, या चॅनलमधील एडिटोरिअल टीम यासाठी खेळाडूंची निवड करणार आहे. एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, आलिम्पिक, वर्ल्ड चॅम्पियनशिप तसेच विशेष रेकॉर्ड ब्रेकर खेळाडूंची यासाठी निवड करण्यात येईल. या जिगरबाज खेळाडूंचे कर्तृत्व सांगणार्‍या स्टोरीज् 27 सप्टेंबर तसेच 1 ऑक्टोबर रोजी 'सीएनएन-आयबीएन'वर रात्री साडेदहा वाजता, तसेच 'आयबीएन-7' आणि 'आयबीएन-लोकमत'वर संध्याकाळी साडेसात वाजता दाखवण्यात येतील. शिवाय या स्टोरीजवर आधारीत 'इंडियन स्पोर्टस्‌ लिजंडस्' हा विशेष कार्यक्रम या चॅनेल्सवरूनच 2 आणि 3 ऑक्टोबर रोजी प्रसारित करण्यात येईल. या उपक्रमाबाबत बोलताना 'नेटवर्क 18' चे एडिटर इन चीफ राजदीप सरदेसाई म्हणाले, देशासाठी आपले बहुमूल्य योगदान देणारे आणि विस्मृतीत गेलेल्या खेळाडंूचा यानिमित्ताने गौरव होणार आहे. त्यांच्या कर्तृत्वाच्या स्मरणातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, हाही यामागचा उद्देश आहे. तर 'आयबीएन-7चे' व्यवस्थापकीय संपादक आशुतोष, म्हणाले, यानिमित्ताने भारतीय स्पोर्टस्‌चा पाया घालणारे, त्याचे वैभव वाढवणार्‍या खेळाडूंचा गौरव होत आहे. खेळासाठी त्यांनी आयुष्यभर घेतलेले परिश्रम यानिमित्ताने समोर यावेत, हाही यामागील उद्देश आहे.'आयबीएन-लोकमत'चे संपादक निखिल वागळे याविषयी बोलताना म्हणाले, भारतीय क्रीडा क्षेत्रातील कर्तृत्व यानिमित्ताने अधोरेखीत होणार आहे. अशा प्रकारच्या उपक्रमातून नवीन पिढी नक्कीच आदर्श घेईल, आणि देशाच्या क्रीडा क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल होईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 8, 2010 05:46 PM IST

इंडियन स्पोर्ट लिजंडस्

देशाचा अभिमान..उल्लेखनीय कर्तृत्व..त्यांचा आदर्श पिढ्यांना प्रेरणा देणारा..स्वप्न वास्तवात उतरणारे..जिगरबाज खेळाडू..! देशाचे नाव उज्ज्वल करणार्‍या या खेळाडूंचा गौरव नेटवर्क 18 करणार आहे.

कॉमनवेल्थ गेम्सच्या निमित्ताने राजधानी सज्ज होत आहे. या पार्श्वभूमीवर या खेळाडूंच्या सन्मानासाठी 'एअरटेल प्रस्तुत इंडियन स्पोर्टस्‌ लिजंडस्' या विशेष उपक्रमाचे 24 सप्टेंबर रोजी दिल्लीत आयोजन करण्यात आले आहे.

नेटवर्क 18च्या सीएनएन-आयबीएन, आयबीएन-7, आयबीएन-लोकमत, सीएनबीसी-टीव्ही 18, सीएनबीसी-आवाज, या चॅनलमधील एडिटोरिअल टीम यासाठी खेळाडूंची निवड करणार आहे.

एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, आलिम्पिक, वर्ल्ड चॅम्पियनशिप तसेच विशेष रेकॉर्ड ब्रेकर खेळाडूंची यासाठी निवड करण्यात येईल.

या जिगरबाज खेळाडूंचे कर्तृत्व सांगणार्‍या स्टोरीज् 27 सप्टेंबर तसेच 1 ऑक्टोबर रोजी 'सीएनएन-आयबीएन'वर रात्री साडेदहा वाजता, तसेच 'आयबीएन-7' आणि 'आयबीएन-लोकमत'वर संध्याकाळी साडेसात वाजता दाखवण्यात येतील.

शिवाय या स्टोरीजवर आधारीत 'इंडियन स्पोर्टस्‌ लिजंडस्' हा विशेष कार्यक्रम या चॅनेल्सवरूनच 2 आणि 3 ऑक्टोबर रोजी प्रसारित करण्यात येईल.

या उपक्रमाबाबत बोलताना 'नेटवर्क 18' चे एडिटर इन चीफ राजदीप सरदेसाई म्हणाले, देशासाठी आपले बहुमूल्य योगदान देणारे आणि विस्मृतीत गेलेल्या खेळाडंूचा यानिमित्ताने गौरव होणार आहे.

त्यांच्या कर्तृत्वाच्या स्मरणातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, हाही यामागचा उद्देश आहे.

तर 'आयबीएन-7चे' व्यवस्थापकीय संपादक आशुतोष, म्हणाले, यानिमित्ताने भारतीय स्पोर्टस्‌चा पाया घालणारे, त्याचे वैभव वाढवणार्‍या खेळाडूंचा गौरव होत आहे.

खेळासाठी त्यांनी आयुष्यभर घेतलेले परिश्रम यानिमित्ताने समोर यावेत, हाही यामागील उद्देश आहे.

'आयबीएन-लोकमत'चे संपादक निखिल वागळे याविषयी बोलताना म्हणाले, भारतीय क्रीडा क्षेत्रातील कर्तृत्व यानिमित्ताने अधोरेखीत होणार आहे.

अशा प्रकारच्या उपक्रमातून नवीन पिढी नक्कीच आदर्श घेईल, आणि देशाच्या क्रीडा क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 8, 2010 05:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close