S M L

महापौरांनी केली शिक्षकांना मारहाण

9 सप्टेंबरमहापौरांनीच शिक्षकांना जाहीर कार्यक्रमात, तेही खुद्द मुख्यमंत्र्यांसमोरच मारहाण केल्याचा प्रकार आज कोल्हापुरात घडला.मुख्यमंत्र्याचे भाषण सुरु असताना या शिक्षण सेवकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कोल्हापूरचे महापौर आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील तसचे त्यांच्या समर्थकांनी शिक्षण सेवकांना मारहाण केली. कोल्हापूर महानगरपालिकनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात काँग्रेस पक्षाची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे भाषण सुरु असताना आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शिक्षण सेवकांवर होणारा अन्याय दूर करा, अशी मागणी करत सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी ही मारहाण करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 9, 2010 05:48 PM IST

महापौरांनी केली शिक्षकांना मारहाण

9 सप्टेंबर

महापौरांनीच शिक्षकांना जाहीर कार्यक्रमात, तेही खुद्द मुख्यमंत्र्यांसमोरच मारहाण केल्याचा प्रकार आज कोल्हापुरात घडला.

मुख्यमंत्र्याचे भाषण सुरु असताना या शिक्षण सेवकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कोल्हापूरचे महापौर आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील तसचे त्यांच्या समर्थकांनी शिक्षण सेवकांना मारहाण केली.

कोल्हापूर महानगरपालिकनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात काँग्रेस पक्षाची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.

या सभेत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे भाषण सुरु असताना आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शिक्षण सेवकांवर होणारा अन्याय दूर करा, अशी मागणी करत सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी ही मारहाण करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 9, 2010 05:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close