S M L

पुणे फेस्टिव्हलचे होणार गणेश कला क्रीडा मंचावर

13 सप्टेंबरआता पुणे फेस्टिव्हलचे कार्यक्रम, गणेश कला क्रीडा मंचावर भरवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.गणेश कला क्रीडा मंचवर सास्कृतिक कार्यक्रम करण्याला, हाय कोर्टाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुणे फेस्टिव्हलचे कार्यक्रम, गणेश कला क्रीडा मंचावर होणार आहेत. गणेश कला क्रीडा मंचाचा वापर, फक्त खेळासाठीच व्हावा, अशी मागणी करणारी याचिका बाळासाहेब थोरवे यांनी हायकोर्टात दाखल केली होती. या याचिकेमुळे गेल्या वर्षभरात गणेश कला क्रीडा मंचामध्ये एकही कार्यक्रम होऊ शकला नाही. पुण्यात दोन ते अडीच हजार प्रेक्षक बसू शकतील असे सभागृह नसल्याने मोठ्या कार्यक्रमांसाठी गणेश कला क्रीडा मंच वापरण्याची वरवानगी द्यावी, अशी मागणी पुणे फेस्टिव्हलच्या आयोजकांनी आणि मान्यवरांनी केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 13, 2010 10:08 AM IST

पुणे फेस्टिव्हलचे होणार गणेश कला क्रीडा मंचावर

13 सप्टेंबर

आता पुणे फेस्टिव्हलचे कार्यक्रम, गणेश कला क्रीडा मंचावर भरवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गणेश कला क्रीडा मंचवर सास्कृतिक कार्यक्रम करण्याला, हाय कोर्टाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुणे फेस्टिव्हलचे कार्यक्रम, गणेश कला क्रीडा मंचावर होणार आहेत.

गणेश कला क्रीडा मंचाचा वापर, फक्त खेळासाठीच व्हावा, अशी मागणी करणारी याचिका बाळासाहेब थोरवे यांनी हायकोर्टात दाखल केली होती.

या याचिकेमुळे गेल्या वर्षभरात गणेश कला क्रीडा मंचामध्ये एकही कार्यक्रम होऊ शकला नाही. पुण्यात दोन ते अडीच हजार प्रेक्षक बसू शकतील असे सभागृह नसल्याने मोठ्या कार्यक्रमांसाठी गणेश कला क्रीडा मंच वापरण्याची वरवानगी द्यावी, अशी मागणी पुणे फेस्टिव्हलच्या आयोजकांनी आणि मान्यवरांनी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2010 10:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close