S M L

चांद्रयान वन प्रोजेक्टचा रिपोर्ट.

बावीस ऑक्टोबरला भारताने चांद्रयान वन यशश्वीरित्या लाँच केलं. त्यानंतर चांद्रयान वनने आपल्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार काम करणं सुरूही केलंय. चांद्रयान वन नेमकं काय काम करतंय, त्याचाच हा एक रिपोर्ट.जगात प्रत्येक भारतीयाची मान ताठ करणारा चांद्रयान वन प्रोजेक्ट. श्रीहरीकोटाहून यशश्वी टेक ऑफ केल्यानंतर, पस्तीस मिनिटांनी चांद्रयान वनकडून सिग्नलही मिळू लागलेत. यामिळणा-या सिग्नलद्वारे चांद्रयान वन नियंत्रित केला जातोय. बंगळुरूपासून चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या, बेल्यालू या गावात मुख्य डायरेक्शन सेंटर आहे. चांद्रयान वन आपल्या बरोबर वेगवेगळं काम करणारी अकरा मशीन घेऊन गेलंय. यातले पाच भारतीय आहेत, तर तीन युरोपीय देशांचे, दोन अमेरीकेचे आणि एक बल्गेरीयाचे आहे. आणि या सर्व मशीननेही आपले काम ठरल्याप्रमाणे सुरू केलंय. या डायरेक्शन सेंटरमधून मिळालेल्या आदेशानुसार, चांद्रयान वन पहिल्यांदा पृथ्वीभोवती फे-या मारणार आहे. त्यानंतर टप्याटप्याने चांद्रयान वनची भ्रमण कक्षा वाढवण्यात येणार आहे. शेवटच्या दोन टप्यात चांद्रयान वन पृथ्वीला, पंच्याहत्तर ते एक लाख किलोमीटर्स अंतरवरून फे-या मारणार आहे. मग चांद्रयान वन चंद्राच्या दिशेने निघेल. आणि चंद्राच्या एक हजार किलोमीटर अंतरावरच्या कक्षेत स्थिरावेल. पण भारतीयांना खरी उत्सुक्ता आहे ती. चंद्रावर इंम्पॅक्टर आदळण्याची. ज्यामुळे भारताच्या चांद्रस्वारीवर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 26, 2008 04:52 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 26, 2008 04:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close