S M L

'सारेगमप'फेम अपूर्वा, राहुल अपघातात जखमी

17 सप्टेंबर'सारेगमप' फेम अपूर्वा गज्जला आणि राहुल सक्सेना यांच्या गाडीला जालन्याजवळ अपघात झाला आहे. या अपघातात हे दोघेही गंभीर जखमी झाले. अपूर्वा गज्जलाची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. तिच्यावर औरंगाबाद येथील धूत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तर राहुल सक्सेनाला जालन्यातील दिपक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याच अपघातात मराठवाड्यातील साऊंड रेकॉर्डिस्ट उदय दंताळे यांचे निधन झाले. हा अपघात जालन्याजवळ झाला. जालन्यातील कार्यक्रम संपवून औरंगाबादमध्ये येत असताना हा अपघात घडला. दरम्यान उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन राहुल सक्सेनाच्या प्रकृतीची चौकशी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 17, 2010 11:43 AM IST

'सारेगमप'फेम अपूर्वा, राहुल अपघातात जखमी

17 सप्टेंबर

'सारेगमप' फेम अपूर्वा गज्जला आणि राहुल सक्सेना यांच्या गाडीला जालन्याजवळ अपघात झाला आहे. या अपघातात हे दोघेही गंभीर जखमी झाले.

अपूर्वा गज्जलाची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. तिच्यावर औरंगाबाद येथील धूत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तर राहुल सक्सेनाला जालन्यातील दिपक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

याच अपघातात मराठवाड्यातील साऊंड रेकॉर्डिस्ट उदय दंताळे यांचे निधन झाले. हा अपघात जालन्याजवळ झाला. जालन्यातील कार्यक्रम संपवून औरंगाबादमध्ये येत असताना हा अपघात घडला.

दरम्यान उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन राहुल सक्सेनाच्या प्रकृतीची चौकशी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 17, 2010 11:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close